वरोरा : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील विविध रुग्णालयांत रक्तसाठा कमी पडत आहे. या अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवावे, या अनुषंगाने दी ट्रॅक फिटनेस क्लब, वरोरातर्फे रक्तदान शिबिर व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दी ट्रॅक फिटनेस क्लबचे संचालक संजय रणदिवे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशिष रणदिवे, सुहास रणदिवे, नीलेश देवतळे, संजीवन ब्लड बँकेचे डॉ. रीमा निनावे उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांनी रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली. यावेळी आशिष रणदिवे यांनी दी ट्रॅक फिटनेस क्लबची भूमिका मांडली. याप्रसंगी माजी सैनिक सागर काहाळे, प्रवीण चिमुरकर, रवी तुरणकर यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. शिबिराला नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सादीक अली, शिवसेना तालुकाप्रमुख मुकेश जीवतोडे, भाजप युवा नेते करण संजय देवतळे, प्रवीण सुराणा, अभय मडावी, महेश श्रीरंग, निशिकांत डफ आदींनी भेट दिली. संचालन आशिष रणदिवे, तर आभार सुहास रणदिवे यांनी मानले. यशस्वीतेकरिता नीशा सिंग, शुभम चिकटे, अक्षय वाढई, सचिन गुजर, राहुल देउळकर, नितीन भोजेकर, शिरीष उगे, अंकुश काकडे, छाया कडलुके, सविता बावणे आदींनी प्रयत्न केले.