बल्लारपूर : कोरोना काळात संपूर्ण देशात वैद्यकीय सेवा प्रभावित झाली होती. मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. याच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन बल्लारपूर पेपर मिल येथे रक्तदान शिबिर राबविण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन युनिट हेड उदय कुकडे यांच्या हस्ते झाले. कुकडे यांनी करोना काळात गणेशोत्सवात कंपनीतर्फे महाप्रसाद वितरण करण्याऐवजी रक्तदान करण्याचे ठरविले, असे सांगितले. यात एकूण ८३ लोकांनी रक्तदान केले. शिबिरात येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच पेपर मिल येथील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गजानन मेश्राम, जी. एम. एच आर. प्रवीण शंकर, अजय दुरतकर, सूचित ठावरी, डॉ. रूपाली यादव, सुनील, आलम, वसंत मांढरे, तारा सिंग, वीरेंद्र आर्या उपस्थित होते.
200921\img-20210920-wa0003.jpg
बल्लारपूर पेपर मिल येथे रक्तदान शिबिर