या शिबिरास व्यापारी संघ नागभीड, नागभीड तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटना नागभीड, नागभीड मित्रमंडळ नागभीड, खैरे कुणबी समाज संघटना नागभीड, लोकमत सखी मंच, झेप निसर्ग संस्था नागभीड, आशा वर्कर संघटना, म.रा.जुनी पेंशन हक्क संघटना नागभीड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्ष यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे, तळोधीचे प्रतिनिधी संजय अगडे, सावरगावचे प्रतिनिधी राजेश बारसागडे, सखी मंच संयोजिका रजनी घुटके प्रयत्नरत आहेत.
बॉक्स
तळोधी येथेही शिबिर
१० जुलै रोजी तळोधी (बा.) येथेही ‘लोकमत’कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करून ''लोकमत रक्ताचं नातं'' या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.