चंद्रपूर : ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, मोटार ट्रेनिंग स्कूल व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, डॉ. विद्या बांगडे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अनंता हजारे, प्रकल्प संचालक अमोल पोतुडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान केल्याने इतरांचा जीव वाचविण्यास मदत होत असते. तर आपले जीवनही सुरळीत राहत असते. त्यामुळे रक्तदान करत राहावे, असे आवाहन केले. यावेळी ५२ जणांनी रक्तदान केले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक तसेच उपप्रादेशिक परिवनह कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:26 AM