लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात इकोर्निया वनस्पती निर्माण झाली आहे. परिणामी लाखों रुपयांचे मत्सबीज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही बाब लक्षात घेत येथील वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेतर्फे रामाळा तलावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.चंद्रपूर शहरातील रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मत्सबीज टाकण्यात येत असते. त्याच्या आधारावर येथील मासेमाराची उपजिविका चालत असते. मात्र मागील काही महिन्यांपासून इकोर्निया वस्पतीने विळखा घातला. त्यामुळे इकोर्निया वनस्पतीला मासे अडकत असल्याने त्यांचा मृत्यू होत होता. परिणामी संस्थेचे आर्थिक नुकसान होत होते. याबाबत संस्थेच्या वतीने शासनाला माहिती देण्यात आली. परंतु, इकोर्निया वनस्पतीचा नायनाट करण्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस इकोर्निया वनस्पती वाढत होती. त्यामुळे संस्थेचे इकोर्निया वनस्पतीचा नायनाट करण्याचा विचार केला. संस्थेचे संभापती जगन पचारे, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग गावतुरे, संचालक हजारे, शंकर बक्कलवार, संतोष झा, किसन पचारे, देवराव मंचर्लावार, लक्ष्मण तोकला, आनंद कस्तुरे यांनी पुढाकार घेऊन तलावात उतरुन स्वच्छता मोहीम सुरु केली. अनेक ठिकाणी या पदाधिकाऱ्यांना डोंग्याचा वापर करावा लागला. गणपतीच्या विर्सजनाच्या वेळेस याच तलावात निर्माल्य टाकण्यात येते. मात्र त्याचीसुद्धा प्रशासनानेतर्फे व्यवस्थीत सफाई करण्यात येत नाही. त्यावेळेसुद्धा संस्थेच्या संदस्यांना सफाई करावी लागत आहे.शासन मासेमारीचा परवाना द्यावामागील अनेक वर्षांपासून संस्थेतर्फे शासन मासेमारीचा परवाना मागण्यात येत आहे. मात्र अजूनही त्यांना परवाना देण्यात आला नाही. त्यामुळे व्यवसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रामाळा तलावाला इकोर्नियाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:10 AM
येथील रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात इकोर्निया वनस्पती निर्माण झाली आहे. परिणामी लाखों रुपयांचे मत्सबीज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही बाब लक्षात घेत येथील वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेतर्फे रामाळा तलावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
ठळक मुद्देमत्सबीज नष्ट होण्याची भीती : वाल्मिकी संस्थेतर्फे स्वच्छता