राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील नेत्ररूग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा गांधी रूग्णालय, सेवाग्राम येथे नेत असताना खडसंगीपासून चार किलोमीटर अंतरावर रूग्णवाहिकेचा अपघात झाला. याची माहिती मिळताच खडसंगी व परिसरातील नागरिक मदतीकरिता घटनास्थळावर धावले. मिळेल त्या वाहनाने ज्येष्ठ नागरिक असलेल्या या जखमी रुग्णांना खडसंगी आरोग्य केंद्रात पोहचविले. आरोग्य कर्मचारी कमी असल्याने नागरिकांनीच स्वत: जखमी रुग्णांची मलमपट्टी केली.सिदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य लोधे यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यातील डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र रूग्णांना नवरगाव परिसरातून कस्तुरबा गांधी रूग्णालय सेवाग्राम येथे एम. एच. ३२ क्यु २०२५ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नेत असताना खडसंगीपासून चार किलोमीटर अंतरावर या रुग्णवाहिकेला अपघात झाला. या वाहनात ६३ रूग्ण अडकले होते. याची माहिती मिळताच खडसंगी येथील सामाजिक कार्यकर्ते जि.प. सदस्य गजानन बुटके,अजहर शेख, ओंकार चिचांळकर, विकी कोरेकार व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एक-एक रूग्णांना बाहेर काढले. त्यानंतर मिळेत त्या वाहनाने रुग्णांना खडसंगी आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या अधिक आणि आरोग्य कर्मचारी कमी, अशी परिस्थिती होती. रुग्ण वेदनेने विव्हळत होते. त्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्यांनीच स्वत: रुग्णांची सेवा करणे सुरू केले. त्यांच्या जखमेवर मलमपट्टी करून मायेची फुंकर घातली. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी चहा-बिस्कीट व अल्पोपहाराचीही व्यवस्था केली.खासगी डॉक्टरांनी केले उपचारअपघातात जखमींची सख्या अधिक असल्याने व खडसंगी आरोग्य केंद्रातील डॉक्टर रजेवर असल्याने खडसंगी येथील खासगी डॉक्टरे डॉ . मंगेश चौरवे, डॉ. अर्जुन मुजूमदार, डॉ. मंगेश घरत, डॉ. विश्वास, डॉ. दडमल यांनी तिथे जाऊन रुग्णांवर उपचार करीत मानवतेचा परिचय दिला.
‘त्यांच्या’ जखमांवर मायेची फुंकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:37 AM
चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील नेत्ररूग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा गांधी रूग्णालय, सेवाग्राम येथे नेत असताना खडसंगीपासून चार किलोमीटर अंतरावर रूग्णवाहिकेचा अपघात झाला.
ठळक मुद्देमानवतेचा परिचय : स्वत:च केली जखमेवर मलमपट्टी