शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मारोडातील बोगस बंधारे स्थायी समितीत गाजले

By admin | Published: July 18, 2015 12:51 AM

मूल तालुक्यातील मारोडा येथील बंधाऱ्यान्ंचे बांधकाम शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलेच गाजले.

अध्यक्षांनी चौकशी नाकारली : विविध मुद्यांवर बैठक गाजलीचंद्रपूर : मूल तालुक्यातील मारोडा येथील बंधाऱ्यान्ंचे बांधकाम शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलेच गाजले. या बंधाऱ्यांच्या चौकशीवरून अध्यक्ष आणि सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. मात्र अध्यक्षांनी बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी फेटाळून लावली.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बंधारे, कृषी अवजारे या मुद्यांवरून गाजणार अशी शक्यता आधीपासूनच सदस्यांमध्ये वर्र्तविली जात होती. या अपेक्षेनुसार ही बैठक चांगलीच गाजली. मारोडा येथील सिंमेंट फ्लग बंधाऱ्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून चौकशीचीही मागणी झाली होती. राजकीय मंडळींच्या निकटस्थ व्यक्तीला या कामाचे कंत्राट दिल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर आणि विनोद अहिरकर यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी या विषयावर कसलेही उत्तर न देता चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला. हा विषय आपल्या क्षेत्रातील असल्याने बाहेरच्या क्षेत्रातील सदस्यांनी यावर बोलू नये, असे त्यांनी सुनावले. यावर, आपण सभागृहाचे सदस्य असल्याने या विषयावर प्रश्न विचारण्याचा हक्क कुणीही नाकारू शकत नाही, अशी भूमिका या सदस्यांनी घेतली. या गदारोळात अध्यक्षांनी बंधाऱ्याच्या बांधकामाच्या चौकशीचीे मागणी फेटाळून लावली.पाणी पुरवठ्याचाही मुद्दा या बैठकीत गाजला. सदस्य नागराज गेडाम यांनी ग्रामीण पाणी पुरवठ्यासंदर्भात मुद्द उपस्थित केला. मात्र जलव्यवस्थापन समितीच्या तांत्रिक मुद्यावरून या प्रश्नावर बरीच ओढाताण झाली. कार्यकारी अभियंत्यांनाही या संदर्भात विचारणा केली असता त्यानीही समाधानकारक उत्तर दिले नाही. शेतीच्य हंगामातही साहित्याचे वाटप न झाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.चिमूर नगर परिषदेची स्थापना नव्याने झाली असून त्यात १२ गावांचा समावेश झाला आहे. मात्र ही गावे पालिका क्षेत्रात आले असली तरी येथील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित न ठेवता या शेतकऱ्यांना या वर्षी समाजकल्याण आणि कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्याची मागणी सदस्य सतीश वारजुकर यांनी केली. त्यावर या वर्षीपुरता या लाभार्थ्यांना मदत पुरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)