यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. सध्या लोकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी ‘नो मास्क नो एन्ट्री’ची कडक अंमलबजावणी करावी. दुपारी चार वाजतानंतर संबंधित आस्थापने बंद झाली पाहिजे. त्यासाठी मनपा, नगर परिषद व तालुका प्रशासनाने पथके सक्रिय कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. २३ व २४ जुलै रोजी अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झालेल्यांच्या पिकांचा पंचनामा करावा. पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. २३ जुलैच्या अतिवृष्टीत झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांमध्ये माहिती कळवावी, असेही आवाहन त्यांनी केले.
बॉक्स
रुग्ण न आढळलेली तालुकानिहाय गावे
जिल्ह्यात १ हजार ६०० गावे आहेत. दीड वर्षात एकही रुग्ण आढळला नसलेल्या गावांची संख्या ३२२ आहे. यामध्ये जिवती तालुक्यातील ९८, बल्लारपूर ९, भद्रावती १२, चंद्रपूर १२, मूल ११, नागभीड १२, राजुरा ३६, सिंदेवाही २७ वरोरा ११, पोंभुर्णा ९, कोरपना २५, ब्रह्मपुरी १३, चिमूर २२, गोंडपिपरी १७ आणि सावली तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.