शहरातील गाडगेबाबा स्मारक समोरील रस्त्यावर घडली.
यामध्ये मृत झालेल्या मुलाचे नाव कार्तिक शिवा कस्तुरकर (१७) रा. धुमनखेडा वार्ड ब्रम्हपुरी असे आहे. कार्तिक हा सामान्य कुटुंबातील असल्याने तो शहरातील स्टेट बँक नजीकच्या एका चश्म्याच्या दुकानात काम शिकण्यासाठी जात होता. घटनेच्या दिवशीसुध्दा तो दुकानात गेला होता. काही कामानिमित्ताने तो दुकानाच्या समोरील परिसरात गेला होता. तिथून दुकानाच्या दिशेने पायी येत रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अँक्टिवा दुचाकीचालकाने कार्तिकला धडक दिली. त्यानंतर त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डाँक्टरांनी त्याला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. तेव्हा रात्री ९ वाजताच्या दरम्यान नागपूर येथे नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात कुटुंबात आई, वडील व भाऊ असा आप्तपरीवार आहे.