लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यासाठी बिटस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा संमेलन प्रत्येक वर्षी पंचायत समिती कोरपनाच्या सभागृहात ज्याप्रमाणे ठरले जाते, त्याप्रमाणे घेण्यात येते. त्यानुसार कोरपना पंचायत समितीची विशेष सभा ७ जानेवारीला घेण्यात आली. त्यामध्ये बिटस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा संमेलन सभागृहाने सवार्नुमते अनुक्रमे वनसडी व बाखर्डी येथे घेण्याचे ठरविले. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हट्टामुळे बिटस्तरीय स्पर्धा संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनी या दोन्ही शाळा वगळून निमणी आणि धानोली (तांडा) येथे १९,२० व २१ जानेवारीला घेतल्याने चक्क बाखर्डी शाळेतील विद्यार्थ्यांनी बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे.पंचायत समिती कोरपना शिक्षण विभागाने केंद्र बाखर्डी येथील शाळेची बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यासंदर्भात सांगितले आणि गावकऱ्यांनी याला होकार देऊन अल्पशा कालावधीत तयारी पूर्ण केली. पण जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्पर्धा बाखर्डीला न घेता निमणीलाच झाली पाहिजे, असे अधिकाºयांना बजावत आपला हट्ट पूर्ण केला आहे. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हट्टापायी बाखर्डी शाळा सतत चार दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी शिक्षण व खेळापासून वंचित आहे. यावर शासनाने मौन बाळगले आहे.-मारोती पारखी, अध्यक्ष शा.व्य. स. बाखर्डीआम्ही गेल्या दोन महिन्यांपासून खेळाचा सराव करत होतो. आणि जेव्हा स्पर्धा आमच्या गावातच होणार आहे, असे कळले. तेव्हा खूप आनंद झाला. परंतु ही स्पर्धा निमणीला गेल्याने खूप दु:ख झाले. आम्ही चार दिवस झाले, शाळेत गेलो नाही. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी निमणी येथे होणाºया क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे.- नयन जेणेकर, विद्यार्थी, बाखर्डी.
बाखर्डी शाळेचा बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:15 PM
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यासाठी बिटस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा संमेलन प्रत्येक वर्षी पंचायत समिती कोरपनाच्या सभागृहात ज्याप्रमाणे ठरले जाते, त्याप्रमाणे घेण्यात येते. त्यानुसार कोरपना पंचायत समितीची विशेष सभा ७ जानेवारीला घेण्यात आली.
ठळक मुद्देसतत चार दिवस शाळा बंद : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान