फारूख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ही बँक बंद असून तीन महिने लोटूनही अनेक शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे.जिवती तालुक्यात पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक असल्याने तालुक्यातील सर्वच शेतकरी या बॅकेतूनच पीक कर्ज घेतात. यासाठी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी प्रस्ताव दाखल केले. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून बँक बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. आर्थिक तंगीमुळे पेरणीची कामे खोळंबली असून अनेकांनी अवैध सावकारांची दारे ठोठावली आहेत. अवैध सावकारांनीही २५ टक्के इतक्या व्याज दराने शेतकºयांना पैसे वाटणे सुरू केल्याची माहिती आहे.शेतकºयांनी बँकेत सातबारा जमा केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी त्यांना ‘नो डू’ प्रमाणपत्र देण्यात आले. एकूण १७ बँकेचे ‘नो डू’ प्रमाणपत्र सादर केल्यानंतर आपल्याला कर्ज मिळेल व पेरणी करू शकणार, अशा आशेवर असणाºया शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून बँक बंद असल्याने चकरा मारावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.पैसे काढण्यात अडचणीतांत्रिक बिघाडामुळे पाटण येथील बँक गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. दरम्यान ज्यांचे पीक कर्ज मंजुर झाले व खात्यात रकम जमा झाली, अशा शेतकऱ्यांचे एटीएम व आधार लिंक नसल्याने दुसऱ्या बँकेतूनही पैसे काढता येत नाही. यामुळे अनेक शेतकरी बँक सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.निराधार नागरिकांचे हालतालुक्यातील अनेक निराधारांचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु, बँक बंद असल्याने अनेक निराधार दररोज बँकेत येऊन परत जातात. ते सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकºयांना त्रास होवू नये यासाठी बँक लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पीक कर्ज वाटप करण्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- संजय धोटे, आमदार, राजुरा.
पाटणच्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज वाटपाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:25 PM
शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण येथे एकमात्र राष्ट्रीयीकृत बँक आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ही बँक बंद असून तीन महिने लोटूनही अनेक शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे.
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली बँक पंधरा दिवसांपासून बंद