लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजप सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलनात आलेली दोन हजारांनी नोट आता बाजारातून गायब झाली आहे.काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने २ हजाराच्या नोटा चलनात आणल्या. नोटाबंदीच्या काळात आलेली दोन हजारांची नोट लोकांना अडचणीचीच ठरत होती. दोन हजारांची नोट पुढे केली. की तेवढे सुटे पैसे देताना लोक विचार करायचे, तांत्रिक कारणास्तव रिझव्हर बँकेनेदेखील या नोटेची छपाई आॅर्डर कमी केली आहे. परिणामी, शिलकीत असलेल्या दोन हजारांच्या नोटांची संख्या कमी झाली आहे.२०१७-१८ मध्ये विविध प्रकारच्या शासकीय छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण ६८ टक्के होते. मात्र, यंदा हे प्रमाण कमी होऊन ४६ टक्क्यांवर आले आहे. आकडेवारीनुसार मार्च २०१७ मध्ये चलनातील दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण निम्म्यावर आले होते. चलनात आलेल्या या नोटांचे प्रमाण अवघे ३१ टक्के आहे. सर्वसाधारणपणे प्राप्तीकर विभाग आणि अन्य संस्थांच्या छापेमारीत अधिक मूल्यांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडतात. पण आता हा ट्रेंड बदलल्याचे चित्र आहे.काही महिन्यांपूर्वी दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली. त्यावर आरबीआयने खुलासा करीत दोन हजारांची नोट बंद झाली नसून छपाई कमी केल्याची माहिती दिली. त्यामुळे व्यवहारामध्ये दोन हजारांच्या नोटा दिसेनाशा झाल्या आहे.नोटबंदीचा धसकानोव्हेंबर २०१६ मधील नोटाबंदीनंतर आता हे सरकार कधीही अधिक मूल्याच्या नोटांवर बंदी आणू शकते. याचा धसका अनेकांनी घेतल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१७-१८ मध्ये प्राप्तिकरच्या छाप्यांमध्ये सापडलेल्या या नोटांचे प्रमाण कमी झाल्याने आता याची धास्ती सर्वसामान्यांनीही घेतल्याने दोन हजार रुपयांची नोट जवळ बाळगण्यास नकार देत आहे.एटीएमचा वापर वाढलाजिल्ह्यात सर्वच बँकांचे एटीएम मशीन आहेत. आता एटीएममधून दोन हजारांची नोट कमी प्रमाणात उपलब्ध होते. पाचशे आणि शंभर रुपयांची नोटच एटीएम मशिनमधून निघत असतात. एटीएममध्ये दोन हजारांची नोट नसल्याने एटीएममधून कॅश रिकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालत असल्याचे दिसून येत आहे.
दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 6:00 AM
२०१७-१८ मध्ये विविध प्रकारच्या शासकीय छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण ६८ टक्के होते. मात्र, यंदा हे प्रमाण कमी होऊन ४६ टक्क्यांवर आले आहे. आकडेवारीनुसार मार्च २०१७ मध्ये चलनातील दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण निम्म्यावर आले होते. चलनात आलेल्या या नोटांचे प्रमाण अवघे ३१ टक्के आहे.
ठळक मुद्देव्यवहारात नोटा कमी : एटीएममधून निघतात पाचशेच्या नोटा