पळसगांव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरीवरूनजवळ असलेल्या उसेगाव आणि वाघेडा या गावादरम्यान उमा नदी आहे. या नदीवर ६ कोटी ८९ लाख रुपये खर्चून १२० मीटरचा पूल साकारणार आहे. निधी उपलब्ध झाला असून लवकरच या पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे. या पुलामुळे अनेक वर्षांपासूनची रखडलेली मागणी पूर्ण होत असल्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांना आनंद पसरला आहे.
उमा नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या परिसरातील अनेक गावांचा नेरीशी संपर्क होत नव्हता. नेरी, वाघेडा, उसेगाव, वडसी आणि या परिसरातील नागरिकांनी या नदीवरील पूल व्हावा, ही मागणी या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्याकडे केली होती. आ. भांगडिया यांनी या नदीवर पूल व्हावा, यासाठी शासनाशी पत्रव्यवहार केला. १२० मीटरच्या अखेर पुलाला मंजुरी मिळाली. ६ कोटी ८९ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला. शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. आता निधीही उपलब्ध झाला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती नेरी जि.प. क्षेत्राचे प्रमुख संदीप पिसे यांनी दिली. मागील अनेक वर्षांपासून या उमा नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित होता अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. अनेक मागण्या निवेदने सादर करण्यात आले. हा प्रश्न सुटला नव्हता.
नेरी हे या परिसरातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. सर्व गावखेडी व्यापार, शिक्षण, उद्योग बँकेचे व्यवहार कार्यालयीन कामकाज आणि इतर अनेक कामांसाठी नेरीवर अवलंबून आहेत. त्यामुळे वाघेडा वडशी, विहिरगाव, पळसगाव, पिपर्डा आणि या परिसरात लागून असलेल्या अनेक गावांचा नेरीशी संपर्क तुटला होता. नेरीला येण्यासाठी चिमूरवरून किंवा इतर खेडी गावातून यावे लागतात. हा मार्ग सिंदेवाही, मूलकडे जाण्यासाठी सोयीस्कर असून या पुलाअभावी दुर्लक्षित झाला होता. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर परिसरातील गावांना महत्त्व प्राप्त होईल.
140921\img-20210914-wa0165.jpg
बांधकाम बाबत निर्णय