लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : पहिल्याच पावसात देऊळवाडा- माजरी मार्गावरील पूल खचल्याने नागरिक व वेकोलि कर्मचाऱ्यांना भद्रावती- कोंढा मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. पूल खचून २० दिवस झाले. प्रशासनाने घटनास्थळी अपघातग्रस्त स्थळ म्हणून फलक लावला. येथे मोठा एखादा अपघात होण्याचा धोका आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वेकालि-माजरी क्षेत्रातंर्गत चार कोळसा खाणी बंद झाल्या. येथील कामगारांची माजरी व इतर क्षेत्रात स्थानांतरण करण्यात आले. यातील बहुतांश कामगार हे भद्रावती शहरात वास्तव्याला आहेत. त्यांना माजरी किंवा वणी क्षेत्रात कर्तव्यास जाण्यासाठी भद्रावती- देऊळवाडा-माजरी हा मार्गच कमी अंतराचा आणि रहदारीच्या दृष्टीने सुरक्षित आहे. माजरी, वणी येथील ये जा करणारे नागरिक याच मार्गाचा उपयोग करायचे. परंतु या खचलेल्या पुलावरून ये जा करणे आता धोकादायक झाले आहे. अपघात होण्याच्या धास्तीने नागरिक वेकोलि कर्मचारी भद्रावती कोंढा- माजरी असा प्रवास करावा आहे. सदर पुलाची दुरूस्ती करण्याची अशी मागणी तेलवासा खाण उपक्षेत्रातील बीएमएस संघटनेचे सचिव वसंत सातभाई व नागरिकांनी केली आहे.
देऊरवाडा-माजरी मार्गावरील पूल खचलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:27 PM