शहराच्या शेवटच्या टोकावर कुर्झा वाॅर्ड वसलेले आहे. आधी कुर्झा व बोंडेगाव ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती. कालांतराने नगरपरिषदेत समावेश करण्यात आला. ग्रामपंचायत काळात येथील भूती नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून हा पूल जैसे थे स्थितीत आहे. या मार्गाने अऱ्हेर, नांदगाव, भलेश्वर, पिंपळगाव येथील नागरिक प्रवास करतात. या पुलाची उंची व रुंदी फारच कमी आहे. नाल्याचे पाणी वाढल्यास हा मार्ग नेहमी बंद होतो. या पुलाची रुंदी फारच कमी असल्याने केव्हाही अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून ट्रॅक्टर, दुचाकी वाहने, वाळूचे ट्रक, प्रवासी वाहणे नेहमी ये-जा करतात. नगरपरिषदेच्या अखत्यारित येत असल्याने नगरपरिषदेने भूती नाल्यावर नव्याने रुंद व उंच पूल बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
150921\img_20210915_101939.jpg
नाल्यावरील अरुंद पुल