हंसराज अहीर यांची उपस्थिती : विद्यार्थ्यांना २० हजाराची शिष्यवृत्ती वाटपराजुरा : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर राजुरा तालुका निजामांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झाला. यासाठी या भागातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. मुक्ती संग्रामच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा, त्यांना मुक्ती संग्रामच्या गाथा समजवून सांगाल तर मुक्तीसंग्राम नव्या पीढीला समजेल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. राजुरा तालुका प्रेस असोसिएशन राजुरा आणि जेसीआय राजुरा रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने किसान भवन येथे आयोजित मुक्ती संग्राम दिन महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ११ गरीब व्यक्तींना मच्छरदानी आणि विद्यार्थ्यांना १८ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेसीआयचे झोन उपाध्यक्ष मेघनाथ जानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण मस्की, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंंडावार, तालुका शिवसेना प्रमुख नितीन पिपरे, जेसीआय रॉयलच्या अध्यक्ष जयश्री शेंडग, सचिव गौरी केवट, भाजपााचे ज्येष्ठ नेते वाघु गेडाम, सतीश धोटे, तालुका पत्रकार संघाचे प्रवीण देशकर, बादल बेले, आनंद चलाख, रंगराव कुळसंगे, एम.के. शेलोटे, अमित जयपूरकर, वामन पुरटकर, जितेंद्र दुबे, मंगेश श्रीराम, महिपाल मडावी, मंगेश बोरकुटे, अविनाश दोरखंडे, जेसेआयचे कुमार केवट, विलास शेंंडे, व्यंकटेश गड्डम, गोपाल सारडा, सचिन डोहे, प्रशांत घरोटे, सुरेश रागीट, जेसीआयचे अध्यक्ष संदीप खोके, प्रा. राजेश खेराणी उपस्थित होते. याप्रसंगी राजुरा तालुका प्रेस असोसिएशनच्या वतीने ना. हंसराज अहीर, आमदार अॅड. संजय धोटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन श्वेता जयस्वाल यांनी केले तर आभार प्रा. बोर्डेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
मुक्ती संग्रामच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा
By admin | Published: September 19, 2015 1:18 AM