लोकमत न्यूज नेटवर्कमूल : बिजली, सडक, पाणी आणि वीज बिल तसेच मालमत्ता कराच्या विरोधात बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टीकडून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव राजु झोडे यांनी केले.सरकारने मागील काही महिन्यांपासून विज बिलामध्ये भरमसाठ वाढ केलेली असून भारनियमन वाढविण्यात आले आहे. मूल शहरात व तालुक्यात काँक्रीट रस्त्याचे व नालीचे काम करण्यात आलेले असून सदर काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळेच अनेक रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत. शहरात वास्तव्य करणाºया नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर लादण्यात आलेले असून हे सरकार सामान्य जनतेचे राहिलेले नाही, असा आरोप राजु झोडे यांनी केला. या आंदोलनात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष भडके, तालुकाध्यख शैलेश वनकर, गिरीष ठेमस्कर, उमाकांत मडावी, मनोज जांभुळे, सचिन भसारकर, सुरेश फुलझेले, प्रविण दुधे, एस.एल. बन्सोड, नकुल उराडे, छकुल वाळके, सुहास खोब्रागडे, आकाश दहिवले, सनम दुर्गे, विजय घडसे, श्रीधर राडत, संजय भडके, सिध्दार्थ भसारकर, जयंत बनकर, शोमरान वनकर यासह बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारविरूद्ध बीआरएसपीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:19 PM
बिजली, सडक, पाणी आणि वीज बिल तसेच मालमत्ता कराच्या विरोधात बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टीकडून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाभर आंदोलन : मागण्यांचे निवेदन अधिकाºयांमार्फत शासनाला पाठविले