लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल- चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्ता नियमांना डावलून खोदण्यात करण्यात आले. या महामागार्मुळे मूल -चंद्रपूर या मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहे. याच रस्त्यावर कित्येक मोठे अपघात होऊन काही जणांचे जीव गेले. रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषण होत असून, याकडे संबंधित विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे सदर आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार व राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता यांनी महामार्गाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी मनीष पुणेकर, शैलेश वनकर, सुजीत खोब्रागडे, काजू खोब्रागडे, नागेश दुधबळे, बालाजी सातपुते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
बीआरएसपीचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:34 PM
मूल- चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देरखडलेल्या रस्त्याचे बांधकाम करा : १५ दिवसात काम न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा