लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘कनेक्टिंग पीपल्स’ असे ब्रीद असलेल्या भारत दूरसंचार निगमची इंटरनेट सेवा सध्या ‘डेड’ झाली आहे. गलेलठ्ठ वेतन घेणाºया अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे बीएसएनएलचे शेकडो ग्राहक कमी झाले असतानाही कमी दराच्या इंटरनेट सेवेमुळे काही ग्राहक टिकून आहेत. मात्र या सेवेत दिवसातून अनेकदा बिघाड येत असल्याने इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे कामकाज दररोज प्रभावित होत असून या सेवेप्रती ग्राहकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.शासकीय कंपनी असलेल्या बीएसएनएलचे जिल्हाभरात जवळपास एक लाख ४० हजार मोबाईलधारक तर २२ हजारच्यावर टेलीफोनधारक ग्राहक आहेत. मात्र योग्य सेवा मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षांत अनेक ग्राहकांनी खासगी दूरसंचार कंपन्यांचा आधार घेत मोबाईल व टेलीफोनसेवा बंद केली आहे. त्यामुळे जवळपास १० हजार टेलीफोनधारक तर ३७ हजारच्या जवळपास मोबाईलधारक ग्राहक कमी झाले आहेत.बीएसएनएलच्या भ्रमनध्वनी सेवेत बिघाड हा नित्याचाच झाला असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत भ्रमणध्वनी सेवेचे जाळे पसरविण्याचे काम बीएसएनएल कंपनीकडून झाले आहे.अनेक गावात भ्रमनध्वनी सेवा बीएसएनएलच्या माध्यमातून पोहोचली आहे. मात्र सेवेत येत असलेला बिघाड ग्राहकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. त्यातच अनेक खासगी कंपन्या गावागावात पोहचल्या असून विविध योजना राबवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत आहेत. मात्र त्या तुलनेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याने ग्राहक खासगी कंपनीकडे वळले असल्याचे दिसून येते.तक्रारीनंतरही इंटरनेट सेवा जैसे थेएखाद्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा खंडीत झाल्यास तक्रार केली जाते. या तक्रारीनंतर बीएसएनएलचा कर्मचारी येऊन तपासणी करतो. मात्र त्यानंतरही बिघाड दूर न झाल्यास आयटी सेक्शनकडे तक्रार केली जाते. मात्र त्यानंतरही बिघाड दूर होत नसल्याची अनेक निमशासकीय कार्यालयाची तक्रार आहे. याकडे मात्र बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असून तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत असतात.खासगी कंपन्या पडताहेत भारीदूरसंचार क्षेत्रात विविध खासगी कंपन्या उतरल्या असून या कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेट सेवा, एसएमएस सेवा, रोमिंग, कॉलिंंग दर हे विविध कंपन्यांचे वेगवेगळे आहेत. या तुलनेत बीएसएनएलचे दर अधिक असल्याचे ग्राहक सांगतात.टॉवर उभारण्यास दिरंगाईदूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल ही एकच शासकीय कंपनी कार्यरत असताना भविष्यातील विचार करून अनेक गावात टॉवर उभारणीसाठी रस्त्यात केबल टाकण्यात आले. मात्र आधुनिकीकरणात नव्याने रस्ते तयार झाले आहेत. यात बीएसएनएलने रस्त्यात टाकलेले केबल तुटले असून आता नव्याने केबल टाकण्यास दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे खासगी कंपन्या अतिरीक्त पैसे मोजून केबल टाकण्यासाठी पाऊले उचलतात. त्यामुळे ग्रामीण भागातही खासगी सेवेचे ग्राहक वाढले आहेत. परिणामी भारत दूर संचार निगमचे अनेक ग्राहक आता सीमकार्ड व टेलीफोन बंद करण्याच्या स्थितीत आहेत.परवानगीसाठी अडकतात कामेएखाद्या गावात टॉवर उभारणी किंवा केबल टाकण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागत असते. यात वरिष्ठांकडून दिरंगाई केली जाते. तर खासगी कंपन्या यात सरस ठरतात. त्यामुळे ग्राहकांचा कल खासगी सेवेकडे वळला असल्याची माहिती खुद्द बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.बीएसएनएलच्या बंगलोर कार्यालयातून अनेक प्लॅन बदलले आहेत. तसेच प्रोफाईलमध्येही बदल झालेला असल्याने एखाद्या कार्यालयाची इंटरनेट सेवा खंडीत होत असते. बरेचदा केबल लाईनमध्येही बिघाड निर्माण होत असल्याने सेवा खंडीत होते.- रमेश रामटेके,मंडळ अभियंता (शहरी)
बीएसएनएलची इंटरनेट सेवा ‘डेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:57 PM
‘कनेक्टिंग पीपल्स’ असे ब्रीद असलेल्या भारत दूरसंचार निगमची इंटरनेट सेवा सध्या ‘डेड’ झाली आहे.
ठळक मुद्देसेवेप्रती ग्राहकांमध्ये प्रचंड रोष : शासकीय-निमशासकीय कार्यालयांची कामे प्रभावित