लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : महावितरण कंपनीतर्फे वारंवार सूचना, नोटीस दिल्यानंतर थकबाकी भरण्यात येत नसल्याने महावितरण कंपनीने धडक मोहीम सुरु केली आहे. बीएसएनएलचे तीन महिन्यांचे बील थकीत असल्याने मंगळवारी महावितरण कंपनीच्या पथकाने बीएसएनएल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत केला. या कारवाई थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.कोरपना तालुक्यात वीजबिल न भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या थकबाकीदारांना महावितरण कंपनीने अनेकदा नोटीस दिल्या. मात्र, त्यांचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. येथील बीएसएनएल कंपनीकडे तीन महिन्यांपासून ७० हजार १७० रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल भरण्याबाबत बीएसएनएल कंपनीला वारंवार सूचना देण्यात आली होती. मात्र, बीएसएनएल कंपनीनी वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे २९ जानेवारी रोजी महावितरण कंपनीने या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. सध्या मार्च एन्डिंगजवळ असल्याने विद्युत विभागाकडून थकीत वीज बिलधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.या धडक मोहिमेअंतर्गत तालुक्यातील अनेक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही कारवाई महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता राहुल नाकले यांच्या नेतृत्वात कर्मचाºयांनी केली. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.कामे प्रभावितबीएसएनएल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने या विभागाच्या सेवा ठप्प पडल्या आहेत. इंटरनेट बंद झाल्याने बीएसएनएल ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. बीएसएनएल कार्यालयाने तातडीने वीजबिलाचा भरणा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
बीएसएनएलला महावितरणचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:39 PM
महावितरण कंपनीतर्फे वारंवार सूचना, नोटीस दिल्यानंतर थकबाकी भरण्यात येत नसल्याने महावितरण कंपनीने धडक मोहीम सुरु केली आहे. बीएसएनएलचे तीन महिन्यांचे बील थकीत असल्याने मंगळवारी महावितरण कंपनीच्या पथकाने बीएसएनएल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत केला. या कारवाई थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
ठळक मुद्देधडक मोहीम : तीन महिन्यांचे बिल थकीत असल्याने वीज कापली