लोकमत न्यूज नेटवर्कमूल : बौद्धधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगिरी येथे १३ वा वर्धापन दिन सोहळा बुद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्थानच्या पुढाकाराने हजारो बौद्धबांधवाच्या उपस्थितीत शनिवारी उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे उद्घाटन भंते संघवंश यांच्या हस्ते पार पडले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बुद्धगिरी सेवा संस्थानच्या अध्यक्ष विजया रामटेके होत्या. प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून यवतमाळचे प्रा. डॉ. सागर जाधव, पालांदूरचे हरिचंद्र लाडे, नागपूरच्या अर्चना भोयर, धामनगावच्या अनिता नाईक, मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव राजू झोडे, चंद्रपूरच्या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते, कौशिकाताई मेश्राम, भारतीय बौद्ध महसभेचे अशोक रामटेके, रमेश मानकर, समता सैनिक दलाचे अशोक पेरकावार आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी भंते संघवंश यांनी आर्य अष्टागीक मार्ग, प्रा.डॉ.सागर जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धम्मक्रांती व आजचे वास्तव, हरिचंद्र लाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन, अर्चना भोयर यांनी जाती विहीत भारत, अनिता नाईक यांनी बावीस प्रतिज्ञा तर सेवचंद्र नागदेवते यांनी बौद्धांची आचारसंहिता आदी विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेषराव सूर्यवंशी, दिगांबर गेडाम, सोमाजी मून यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता ‘आम्ही भीमाची लेकरं’ हा विशाल बावणे यांचा भीमगीताचा कार्यक्रम सर्वांचे मन वेधून नवा उत्साह निर्माण करणारा ठरला.कार्यक्रमाचे संचालन अमोल वाळके, प्रास्ताविक वनमाला रामटेके तर उपस्थितांचे आभार पुरुषोत्तम साखरे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातून हजारो बौद्ध बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.
मूल येथे बुद्धगिरी वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 11:42 PM