लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०१९-२० चा वार्षिक अंदाजपत्रक मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी मनपाच्या विशेष सभेत मंजुरीसाठी सादर केला. या अंदाजपत्रकानुसार चालू वर्षात ५०७ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जमा-खर्च जाता ९५ लाख ७९ लाख रुपये शिल्लक दाखविण्यात आले आहे. या अंदाजपत्रकाला विशेष सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली.महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी आज महापालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी सन २०१८-१९ चा सुधारित व सन २०१९-२० चा मूळ अंदाजपत्रक सभागृहात मंजुरीसाठी सादर केला. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही, असे पावडे यांनी प्रारंभीच स्पष्ट केले. या बजेटमध्ये अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा, पंतप्रधान आवास योजन्ेंतर्गत सर्वांसाठी घरे, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय, बाबुपेठ उड्डाणपूल, १४ वा वित्त आयोगामधून घरकचरा व्यवस्थापन आदी बाबींसाठी तरतूद करण्यात आली आहे. महापालिका निधीमधून विद्यार्थ्यांकरिता मॉडेल स्कूल, दिव्यांगासाठी विविध योजना तसेच स्मशानभूमी निर्माण, बगिचांचा विकास, शहर सौंदर्यीकरण, नवीन फायर स्टेशन, वाहनतळ, पथदिवे आधुनिकीकरण यासाठीही निधीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. एकूण या अंदाजपत्रकानुसार ५०७ कोटी ७० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.निवासस्थानासाठी यंदा तरतूदमहानगरपालिकेतील महापौर, आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे यंदाच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.मोकळ्या जागांचा विकास२०१८-१९ मध्ये शहरातील विविध भागात उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या जागांचा विकास करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली होती. यातून काही ठिकाणी मोकळ्या जागेत बगिचे तयार झाले आहेत. आता यावर्षी पुन्हा या कामासाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय रैन बसेरा निर्माणासाठी सव्वा कोटींची तरतूद आहे.असा जाणार पैसासध्या चंद्रपुरात अमृत योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी २०१९-२० या वर्षात ८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.पाणी टंचाई निवारणासाठी दोन कोटींची तरतूदस्वच्छ महाराष्ट्र अभियान, नगरोत्थान, भूमिगत गटार योजना, कर्मचारी मानधन, सेवानिवृत्ती वेतन यासाठी ११ कोटी ६० लाखांची तरतूदमहापालिकेच्या मॉडेल स्कूलसाठी १ कोटींची तरतूदमहिला व बालकल्याणाच्या विविध योजनांसाठी तीन कोटी २० लाखांची तरतूदआर्थिकदृष्टया मागास घटकांकरिता विविध सुविधा पुरविण्यासाठी दोड कोटींची तरतूददिव्यांग धोरणासाठी दीड कोटींची तरतूदस्मशानभूमी निर्माण व विकास यासाठी अडीच कोटींची तरतूदशहर सौंदर्यीकरणासाठी दोन कोटींची तरतूदमहापौर चषकासाठी ६५ लाखांची तरतूदनवीन विद्युत लाईन व पथदिवे आधुनिकीकरणासाठी दोन कोटींची तरतूदबगिचा पुनर्निर्माण व विकासासाठी ९० लाखांची तरतूदनवीन फायर स्टेशन बांधकामासाठी एक कोटींची तरतूदआरोग्यविषयक सोईसुविधांसाठी ९० लाखांची तरतूद.असा येणार पैसा२०१९-२० या वर्षात मालमत्ता करापोटी ३४ कोटी ७२ लाख रुपये मिळणार.वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकानुसार देण्यात येणाऱ्या परवानगीपोटी सन दोन कोटींचे उत्पन्न.एलबीटी व जीएसटी सहायक अनुदान ६६ कोटी रुपये.१४ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१९-२० या वर्षात ३२ कोटी रुपयांचे अनुदान.नगररचना विभागामार्फत शहरातील विविध बांधकामांना देण्यात येणाºया परवानगी व विकास शुल्कापोटी तीन कोटींचे उत्पन्न.शासनाकडून विविध योजना राबविण्यासाठी २३२ कोटींचे अनुदान.मनपा मालमत्ता मिळकतीपासून दोन कोटी ७२ लाखांचे उत्पन्न.
मनपाचे ५०७ कोटींचे बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:33 PM
चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०१९-२० चा वार्षिक अंदाजपत्रक मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी मनपाच्या विशेष सभेत मंजुरीसाठी सादर केला. या अंदाजपत्रकानुसार चालू वर्षात ५०७ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जमा-खर्च जाता ९५ लाख ७९ लाख रुपये शिल्लक दाखविण्यात आले आहे. या अंदाजपत्रकाला विशेष सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली.
ठळक मुद्दे९५ लाख ७९ हजार शिल्लक : विशेष सभेत अर्थसंकल्पाला मंजुरी