पशुस्वास्थ्य शिबिर : मैंदळकर यांचे प्रतिपादनभद्रावती : पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भद्रावती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना घोडपेठतर्फे मौजा गोरजा येथे पशुस्वास्थ्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संगीता नळे, प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भास्कर गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर, कामधेनू अध्यक्ष महेश ठेंगणे, सुरेश वांढरे, सचिन बल्की, पुरुषोत्तम नळे, संजय अटकरी, संगीत नळे उपस्थित होते.डॉ. मैंदळकर म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे पाण्याचे चटके माणवाला व प्राण्याला सहन करावे लागत आहे. १९६० मध्ये जलतज्ञाने पाणी विकत घ्यावे लागेल व पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे, असे भाकीत वर्तविले होते. ते आज अनुभवास मिळत आहे. मराठवाड्यात रेल्वेने पाणी पोहचविले जात आहे. मानवाची तृष्णा भागविण्याकरिता ठिकठिकाणी पाणपोई लावल्या जाते. मुकी जनावरे शहरात तसेच ग्रामीण भागात पाण्यासाठी दारोदार भटकतांना दिसतात. त्यांच्याकरिता पाणवठे बांधण्यासाठी गावातील संघटना, मंडळ, ग्रामपंचायत, समाजसेवक यांनी सहकार्य करुन मुक्या प्राण्याविषयी भूतदया दाखवावी, मुक्या प्राण्यांना त्यांची गरज सांगता येत नाही. अशा मुक्या प्राण्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा होय. पाण्याविना जनावरे मृत्युमुखी पडताना पाहिलेले आहे. नागरिकांनी या कार्यास सढळ हाताने मदत प्रत्येक गावात किमान पाणवठे बांधावे. (वार्ताहर)
मुक्या प्राण्यांकरिता पाणवठे बांधा
By admin | Published: May 29, 2016 1:02 AM