अनेकश्वर मेश्राम।आॅनलाईन लोकमतविसापूर : विदर्भात बल्लारपूर तालुका सर्वात प्रथम हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला. स्वच्छता अभियानात तालुक्यातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा दिल्लीपासून मुंबईपर्यंत गौरव झाला. जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छतेचा बल्लारपूर तालुका पॅटर्न म्हणून कौतुक केले. केला. मात्र, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २५ लाखांच्या भव्य इमारतीत शौचालय नसल्याने वास्तव समोर आले आहे.केंद्र व राज्य सरकार आरोग्य समस्येवर मात करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन राबवित आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली जात आहे. याच माध्यमातून चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहरासह स्वच्छता अभियानात अग्रेसर होण्याकडे वाटचाल करीत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अद्ययावत बांधकाम करण्यात आलेल्या शाळेत शौचालय बांधकामाचा कसा विसर पडला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.विसापूर येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीत शौचालय नसल्याचा प्रकार पालकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. विसापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीचे बांधकाम सन २०१४-१५ वर्षात करण्यात आले. दुमजली इमारत देखण्या स्वरूपात आकारास आली. वर्षभरापासून या शाळेत वर्ग १ पासून ४ पर्यंतचे विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. यावर २५ लाख रुपये निधी खर्च करण्यात आले. उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांसाठी शौचालय नसल्यामुळे गैरसोय सहन करावी लागत आहेत. शासकीय बांधकामात शौचालय बांधकाम आवश्यक आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने शाळा इमारत बांधकाम केले. परंतु शौचालय बांधकाम केले नाही, हे न समजणारे कोडे आहे. याकडे अधिकाऱ्यांनी देण्याची मागणी पालकांन केली आहे.शाळेला शौचालय बांधकाम करून द्यावे म्हणून पंचायत समितीला कळविले आहे.पाठपुरावा सुरू असून सरपंच यांना प्रत्यक्ष भेट घेवून ही बाब अवगत केली. आमच्या शाळेत तातडीने शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी संबंधितांना भेट घेवून सांगितले आहे.- सुरेखा कुलटे, मुख्याध्यापक, जि.प.शाळा,विसापूर.विसापूर येथील जि. प. शाळेत शौचालयाचे बांधकाम रोहयोतून करण्यास सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना सांगण्यात आले. मात्र, अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. संबंधित कंत्राटदाराचे अंदाजपत्रक पाहून लवकरच उपाययोजना करणार आहे.- गोविंदा पोडे, सभापती, पं. स. बल्लापूर
२५ लाखांची इमारत पण, शौचालयच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 10:56 PM
विदर्भात बल्लारपूर तालुका सर्वात प्रथम हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला. स्वच्छता अभियानात तालुक्यातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा दिल्लीपासून मुंबईपर्यंत गौरव झाला. जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छतेचा बल्लारपूर तालुका पॅटर्न म्हणून कौतुक केले.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : विसापूर शाळेतील वास्तव