लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी मागील ६ महिन्यात जप्त केलेली ८९ लाख ८१ हजार २०० रूपयांची दारू, बुलडोजर चालवून नष्ट केली. दरम्यान, दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्याच्या कारवाया सुरूच आहेत.२३ नाव्हेंबर २०१८ ते ३० जून २०१९ या कालावधीत बल्लारपूर पोलिसांनी देशी व विदेशी ८१ लाख ८१ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली होती. पोलीस ठाण्यात हा दारूसाठा ठेवण्यात आला होता. रविवारी बामणी गावाजवळ दारूच्या बाटलांवर बुलडोजर चालवून दारू नष्ट करण्यात आला. या कारवाई प्रसंगी बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजुरा येथील पोलीस निरीक्षक भगत, मनोहर मडावी, कृष्णादास माथनकर, शिपाई किशोर सहारे, हवालदार सुभाष सिडाम आदी उपस्थित होते.
८० लाखांच्या दारूवर बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:40 PM