लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून दारुबंदी आहे. त्यानंतरही दारूची चोरटी वाहतूक आणि विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून दारूविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहिम सुरु आहे. रामनगर पोलिसांनी मागील तीन वर्षात अनेक कारवायातून कोट्यवधींचा दारूसाठा जप्त केला. जप्त दारूसाठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर एक कोटी ४७ लाखांचा दारूसाठ्यावर बुलडोजर चालवून नष्ट करण्यात आला.दारूबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. दररोज लाखो रुपये किंमतीची दारू जिल्ह्यात विविध मार्गाने येत आहे. पोलीस विभागाकडून दारू तस्करांवर कारवाया केल्या जात आहेत. यानंतरही माफियांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करून दारू जिल्ह्यात आणली जात आहे. रामनगर पोलिसांनी गेल्या दोन-तीन वर्षात दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करताना कोट्यवधींचा दारूसाठा जप्त केला. रोजच्या कारवाईमुळे पोलीस विभागाकडे मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोळा झाला आहे. अनेक पोलीस ठाण्यात जप्त दारूसाठा साठवून ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांनी जप्त दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर एक कोटी ४७ लाखांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला. नागपूर मार्गालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात दारूसाठ्यावर बुलडोजर फिरविण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, उत्पादन शुल्क विभागाचे पाटील पोलीस शिपाई गजानन डोईफोडे उपस्थित होते.
दीड कोटींच्या दारूवर बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 6:00 AM
रोजच्या कारवाईमुळे पोलीस विभागाकडे मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोळा झाला आहे. अनेक पोलीस ठाण्यात जप्त दारूसाठा साठवून ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांनी जप्त दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर एक कोटी ४७ लाखांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला.
ठळक मुद्देन्यायालयीन आदेश : रामनगर पोलिसांद्वारे जप्त केलेला दारुसाठा