लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी लाखोंचा दारूसाठा जप्त केला. अनेकदा जप्त केलेल्या करोडो रूपयांच्या या दारूसाठ्यावर पोलिसांनी बुलडोजर चालवून दारुसाठा नष्ट केला.चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी झाली आहे. मात्र यानंतरही जिल्ह्यात चोरीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारुतस्करी होत असून रोज कोट्यवधीची दारु जिल्ह्यात येत आहे. पोलीस विभागाद्वारे दररोज दारूविक्रेत्यांविरोधात कारवाई होत आहे.गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत कोट्यवधी रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. अनेक पोलीस ठाण्यात तर जप्त केलेली दारु ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती आहे. जप्त दारु नष्ट करण्याची प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत खोळंबत असल्याने दारुसाठा कुठे ठेवायचा हा पेच पोलिसांसमोर निर्माण होत होता.अखेरीस विविध गुन्ह्यात जप्त केलेला दारुसाठा नष्ट करण्याची न्यायालयाकडून परवानगी प्राप्त होताच ६ जून रोजी कोट्यवधी रुपये किंमतीच्या दारुसाठ्यावर बुलडोजर फिरविण्यात आला. यात सावली पोलीस ठाण्यातील ३६ गुन्ह्यातील २८ लाख ६४ हजार ७९०, दुर्गापूर पोलीस ठाण्यातील ६१ गुन्ह्यातील ६ लाख ८८ हजार, राजुरा पोलीस ठाण्यातील १० गुन्ह्यातील ११ लाख, पडोली पोलीस ठाण्यातील ९९ गुन्ह्यातील ३९ लाख ९९ हजार १५० आणि भद्रावती पोलीस ठाण्यातील ३३५ गुन्ह्यातील दारुसाठा नष्ट करण्यात आला.पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात संबंधीत पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी ही कारवाई पार पाडली.
जप्त केलेल्या कोट्यवधीच्या दारूसाठ्यावर चालला बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:00 PM
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी लाखोंचा दारूसाठा जप्त केला. अनेकदा जप्त केलेल्या करोडो रूपयांच्या या दारूसाठ्यावर पोलिसांनी बुलडोजर चालवून दारुसाठा नष्ट केला.
ठळक मुद्देन्यायालयाचा निर्णय : ३३५ गुन्ह्यांतील दारूसाठा नष्ट