लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डिझेल दर वाढीमुळे एसटी महामंडळाने १८ टक्के तिकीट दर वाढविले आहे. या दर वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे वाहन चालविणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपूर बसस्थानकावर नारळ पाणी वाटप करण्यात आले.एसटी ही लोकवाहिनी आहे. मात्र भाजप सरकार खासगी बसगाड्यांच्या मालकांशी हात मिळवणी करुन मोठी खंडणी वसूल करीत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर बसस्थानक येथे लोकवाहीनीची पूजा करुन प्रवाशांचा आक्रोश शांत करण्याकरिता नारळ पाणी वाटप करण्यात आले.त्यानंतर विश्वासघाती भाजप व शिवसेना युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, अखिल भारतीय कामग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सुनीता लोढीया, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, प्रदेश सचिव नंदा अल्लूरवार, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, राजेश सोलापन, अनिल सुरपाम, भास्कर दिवसे, निखील धनवलकर, घनश्याम वासेकर, शालीनी भगत, दीपक कटकोजवार, प्रकाश अधिकारी, सुरेश आत्राम, विकास टिकेदार, कुमार पोतनवार, सुरेश दुर्लेवार, राजेंद्र आत्राम, अशपाक शेख, राजकुमार रेवल्लीवार, बकार काजी, वंदना बेले, रितू गजगाटे, पुष्पा शेंडे, वैभव बानकर, दीपक नायडू यांच्यासह चंद्रपूर शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नारळ पाणी वाटून बस भाडेवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:16 PM
डिझेल दर वाढीमुळे एसटी महामंडळाने १८ टक्के तिकीट दर वाढविले आहे. या दर वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे वाहन चालविणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपूर बसस्थानकावर नारळ पाणी वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : युती सरकारच्या विरोधात घोषणा