कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून एस.टी.ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी त्याचा फटका महामंडळाला बसला आहे. आता सोमवारपासून नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासी मिळत नसल्याचे चालक तसेच वाहकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यामध्ये २४५ बसेस आहेत. लाॅकडाऊनपूर्वी त्यांतील केवळ ३० ते ४० बसफेऱ्या सुरू होत्या. आता मात्र नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विभागातील चिमूर, वरोरा, चंद्रपूर, राजुरा या आगारांतून नागपूर तसेच अन्य लांब अंतराच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत असले तरी अन्य गावांतील बसेस रिकाम्याच जात आहेत.
रेल्वेलाही प्रवासी नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात बल्लारपूर रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे थांबतात. मात्र अपेक्षित प्रवासीच नाहीत. त्यामुळे रेल्वेस्थानकांवरही शुकशुकाट बघायला मिळत आहे.
बाॅक्स
एस.टी.च्या फेऱ्या - ८०
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३,५००
धावणाऱ्या रेल्वेची संख्या - २५
बाॅक्स
चंद्रपूर-नागपूर बसला गर्दी
लाॅकडाऊननंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, बसफेऱ्याही नियमित धावत आहेत. चंद्रपुरातून नागपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चंद्रपूर-नागपूर या बसफेऱ्यांना बऱ्यापैकी प्रवासी मिळत आहे. अनेकवेळा बसमध्ये गर्दीसुद्धा होत आहे.
बाॅक्स
बऱ्यापैकी उत्पन्न
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळतात काही प्रवासी घराबाहेर पडले आहे. त्यामुळे एस.टी.ला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. यामध्ये काही दिवसांमध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास आगारप्रमुखांना आहे.
बाॅक्स
अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास
कोट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील काही दिवसांपासून बाहेर जाणे टाळले. आता लाट ओसरली असल्यामुळे गावाकडे जाण्याचा विचार करीत आहोत. मात्र आताही हिंमत होत नाही.
- वसंत बल्की
चंद्रपूर
कोट
लाॅकडाऊन झाल्यापासून कुठेच गेलो नाही. आता सर्व व्यवहार सुरू झाले असून एस.टी.पण सुरू झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत योग्य काळजी घेऊन बाहेरगावाला जाण्याचा बेत आहे.
कोमल पिंपळकर
चंद्रपूर
कोट
सध्या शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे बी-बियाणे तसेच इतर साहित्य आणण्यासाठी शहरात जावे लागत आहे. कधी एस.टी.ने तर कधी ऑटो तसेच मिळेल त्या साधनाद्वारे जावे लागत आहे. आता एस.टी. नियमित सुरू झाल्यामुळे प्रवास करणे सुलभ झाले आहे.
महादेव खाडे
बल्लारपूर
कोट
दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे सर्व प्रवास बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी प्रथम आरक्षण करावे लागते. एवढे करूनही पुढील गावात सुविधा मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जाणे सध्या तरी टाळलेलेच बरे.
- प्रतीक कोडापे
चंद्रपूर