गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेत मनपाचे पथक कारवाई करण्यासाठी दाखल झाले. यावेळी येथील एका दुकानावर कारवाई करून पथकाने कुलूप ठोकले. वेळ पूर्ण झाल्यानंतर दुकान सुरू नव्हते, तर शटर बंद करून आतमध्ये हिशोब सुरू असल्याचा दावा दुकानदाराने केला. यावरून मनपाचे कारवाई पथक व व्यावसायिकांमध्ये वाद झाला. मनपाच्या या कारवाईविरोधात व्यावसायिक एकवटल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. काही व्यापाऱ्यांनी ही माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना दिली. आमदार जोरगेवार यांनी मध्यस्थ करून वाद सोडविला. मनपा प्रशासनाने कारवाई करताना माणुकीचा दृष्टिकोन ठेवावा. कोरोना साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनी नेहमी प्रशासनाला मदत केल्याचे पटवून दिले. त्यामुळे कारवाई मागे घेण्यात आली. आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्त्वात व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना भेटले.
मनपा पथकाच्या कारवाईमुळे व्यावसायिक भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:22 AM