लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : चिमूर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराने अनेक बसगाड्या उशिरा धावतात. काही बसफेऱ्यांच्या वेळात बदल केल्याने मोटेगाव येथील नवरगाव व नेरीला शिक्षण घेण्यासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना महत्त्व न देता बसगाड्या पंढरपूर वारीवर पाठविल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी मोटेगाव बसथांब्यावर चिमूर आगाराच्या बसगाड्या अडवून रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.शाळेच्या वेळेत व शाळा सुटण्याच्या वेळेत बसगाडी नसल्याने बाहेर गावातील विद्यार्थ्यांना अनेकदा खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत अनेकदा विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले. मात्र आगार प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी ६.३० वाजतापासूनच मोटेगाव येथील बस थांब्यावर वाहतूक अडवून धरली. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू होते. यावेळी विलास कोराम, विलास डांगे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. बसस्थानक प्रमुख कांबळे विद्यार्थ्यांच्या मागणीचे लेखी पत्र घेवून आंदोलन स्थळी पोहोचले आणि २६ जुलैपासून नियमित बसफेºया सोडण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी डॉ. हटवादे, अजीत सुकारे, जगदीश सुकारे, जयस्वाल, बोरकर, प्रा. नाकाडे व विद्यार्थी उपस्थित होते.
संतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:57 PM
चिमूर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराने अनेक बसगाड्या उशिरा धावतात. काही बसफेऱ्यांच्या वेळात बदल केल्याने मोटेगाव येथील नवरगाव व नेरीला शिक्षण घेण्यासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना महत्त्व न देता बसगाड्या पंढरपूर वारीवर पाठविल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी मोटेगाव बसथांब्यावर चिमूर आगाराच्या बसगाड्या अडवून रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
ठळक मुद्देचिमूर आगाराचे दुर्लक्ष : शाळांच्या बसफेऱ्या पंढरपूर वारीवर