चंद्रपूर जिल्ह्यात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम जोमात सुरू आहे. ग्रामीण भागाला या अभियानाचा मोठा लाभ होत आहे. विविध प्रकारच्या प्रेरिका या अभियानाचा पाया आहे. त्यांना मूल्यांकनानुसार प्रतिमहिना मानधन दिले जाते. मात्र, कोरोना महामारी काळात ग्रामीण भागात स्वयंसाहाय्यता समूह, ग्रामसंघाकरिता विविध कामे करणाऱ्या प्रेरिकेचे मानधन दिले गेलेले नाही. राज्य कक्षाकडून मागील दोन वर्षांपासून या योजनेकरिता पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने प्रेरिकांचे मागील काही महिन्यांचे मानधन थकीत आहे. जिल्हा कक्षांच्या वार्षिक आराखड्यांपैकी ५० टक्के निधीही गतवर्षी देण्यात आलेले नाही. परिणामी, प्रलंबित मानधन रक्कम सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा कक्षांना प्रलंबित मानधनासाठी निधी द्यावा, अशी मागणी उमेदच्या केडरकडून होत आहे.
थकीत मानधनाअभावी केडर अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:30 AM