१ जूनपासून १५ दिवसांसाठी २० जिल्ह्यांत लॉकाडाऊनच्या काही नियमांत बदल झाला. यासाठी कोविड पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करण्यात आला. यापुढे २९ मे २०२१च्या तारखेपासून येत्या शनिवार (दि. ५) पर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता किती कमी होईल, यावरच निर्बंध उठणार की कायम राहणार असल्याचे समजते.
कोट
सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली. मात्र प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयाला आतापर्यंत सहकार्य मिळाले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असला तरी फार मोठा फरक नाही. त्यामुळे निर्बंध शिथिल झाले असते तर अर्थचक्र सुरू होण्यास मदत मिळाली असती. याचा पुनर्विचार व्हावा.
- सदानंद खत्री, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ तथा उपाध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स