फोटो : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिष्टमंडळ.
चंद्रपूर : ग्रामपंचायतीच्या उमेदवारीसाठी नवीन खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅंक नसल्याने मोठी अडचण जात आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी किसान कॉंग्रेस चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक होवू घातली आहे. या निवडणुकीसाठी विविध कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली. यामध्ये उमेदवारांचे राष्ट्रीयकृत बॅंकेत नवीन खाते उघडण्याची अट टाकली आहे. मात्र जिल्ह्यातील काही गावे ही अती-दुर्गम भागात आहेत. तर अनेक तालुक्यात राष्ट्रीयकृत एकमेव बॅंक आहे. त्यामुळे खाते उघडण्यास अडचण जात आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी किसान कॉंग्रेस चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी कृ. उ. बा. स. सभापती दिनेश चोखारे, कृ. उ. बा. स. संचालक चंद्रकांत गुरु, माजी पं. स. सभापती रोशन पचारे, माजी सरपंच गणेश आवारी, माजी उपसरपंच चंदू माथने, माजी ग्रा. पं. सदस्य सुबोध कासवटे, योगेश ठाकरे आदी उपस्थित होते.