सिंदेवाही : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व्यवसायासोबत भाजीपाला शेतात लावतात. परंतु महागाईचा भडका असूनही कारली दोन रुपये किलो याप्रमाणे शेतकऱ्यांकडून ठोक खरेदी केली जात आहे. एवढा कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील शेतकरी जोडधंदा म्हणून शेतीसोबत भाजीपाला शेतात पिकवतात. शेतकरी पावसाळ्यातील धानाचे उत्पन्न निघेपर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. महागाई वाढल्यामुळे सर्व वस्तू महाग झाले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला ठोकमध्ये घेताना अल्प दर दिला जात आहे. ठोक भाजी विक्रेते कारली दोन रुपये किलो याप्रमाणे खरेदी करीत आहेत. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भाजीपाला व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे.
200821\1817-img-20210820-wa0030.jpg
कारली खरेदी करताना ठोक व्यापारी