लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरातील तुकुम तलाव येथील एका मशीदीमध्ये तब्बल ११ तुर्कीस्तानी व २ भारतीय असे १३ मौलवी २२ दिवसांपासून होते. २५ मार्च रोजी ही बाब उजेडात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीत ११ तुर्कीस्तानी मौलवींकडून व्हिसाचा गैरवापर झाल्याची बाब समोर येताच त्यांच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात विदेशी अधिनियम कायद्यांतर्गत १८८, २६९, २७०, १४ बी, १४ सी, ७ सी, २ अन्वये गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे. या सर्व १३ ही मौलवींना सध्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहेत. १४ दिवसांचा कालावधी संपताच त्यांच्यावर पुढील कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.२५ मार्च रोजी १३ मौलवी २२ दिवसांपासून तुकुम येथील एका मशीदीत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या आधारे पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने मशीद गाठून या मौलवींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले होते. यामध्ये ११ तुर्कीस्तानी आणि दिल्ली व आसाम येथील प्रत्येकी एका मौलवीचा समावेश होता. हे मौलवी तुर्कीस्तानातून कोणत्या हेतूने चंद्रपूरात आले, याचा उगलडा अद्याप झालेला नसल्याचे पोलिसांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यांच्याकडे व्हिसा असल्याने त्यांच्यावर त्यावेळी कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नव्हती. परंतु प्रकरण तपासात होते. अधिक तपासात ११ तुर्कीस्तानी मौलवींना मिळालेला व्हिसा हा पर्यटनासाठीचा होता. असे असताना ही मंडळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. ही धक्कादायक बाब सखोल चौकशीत निष्पन्न होताच शहर पोलीस ठाण्यात ११ तुर्कीस्तानी मौलवींविरुद्ध व्हिसाचा गैरवापर केल्याप्रकरणी अखेर गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हे मौलवी ३ मार्चरोजी चंद्रपूरात आले होते. तेव्हापासून त्यांचा १४ दिवसांचा कालावधीत निघून गेला होता. त्यांच्यात कोरोनाबाबतची लक्षणे आढळली नाही. पुन्हा या सर्व १३ मौलवींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘त्या’ ११ तुर्कीस्तानी मौलवींविरुद्ध अखेर चंद्रपुरात गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:32 PM
चंद्रपूरातील तुकुम तलाव येथील एका मशीदीमध्ये तब्बल ११ तुर्कीस्तानी व २ भारतीय असे १३ मौलवी २२ दिवसांपासून होते. त्यांच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात विदेशी अधिनियम कायद्यांतर्गत १८८, २६९, २७०, १४ बी, १४ सी, ७ सी, २ अन्वये गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देपर्यटनाच्या व्हिसावर धार्मिक कार्यक्रमात सहभाग शहर पोलिसांची कारवाई