जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या २३ हजार २३४ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७३८ झाली आहे. सध्या १०३ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख सहा हजार ५९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८१ हजार ५३९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३९३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या १९ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १२, चंद्रपूर तालुक्यात तीन, भद्रावती एक, मूल एक, राजुरा एक व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मास्क वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.