चंद्रपूर: सहकार क्षेत्रातील देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकरिता सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या जिल्हा बँकांना अॅवीज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलस्की इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बँको पुरस्कार देण्यात येतो. सन २०१५-१६ चा पुरस्कार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच प्रदान करण्यात आला.रिआ रिसोर्ट, गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात रिझर्व्हे बँक आॅफ इंडियाचे पूर्व मुख्य महाप्रबंधक दत्तात्रय काळे यांचे हस्ते बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, अनिल खनके, श्रीपाद पाटील, चंद्रकांत गोहोकार, गजानन पाथोडे, डॉ. ललित मोटघरे, अधिकारी मारोती पोटे, श्याम चिलमुलवार यांनी हा पुरस्कार स्विकारला. सदर कार्यक्रमाला देशातील ७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ठ काम करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दरवर्षी बँको हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ‘ठेव वाढ श्रेणीत’ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशातील सहकारी बँकांच्या श्रेणीतून द्वितीय पुरस्कार चंद्रपूर सीडीसीसी बँकेला प्रदान करण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)
सीडीसीसी बँक बँको पुरस्काराने सन्मानित
By admin | Published: March 28, 2017 12:30 AM