बालिका अपहरण प्रकरण : भयभीत पालकांची मागणीब्रह्मपुरी : बुधवारी ख्रिस्तानंद विद्यालयातून अपह्त झालेल्या शिवानी नामक चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी सुखरुप परत आणले. असे असले तरी या घटनेने पालकवर्गांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे शाळांसमोर व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमरे बसवावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. निसर्ग उपचार केंद्राद्वारे बनविलेल्या औषधांचा व्यवसाय करणारे मोहन गजबे यांच्या शिवानी नामक बालिकेचे बुधवारी ख्रिस्तांनद विद्यालयातून अपहरण करण्यात आले. यात पोलिसांनी मोहन गजबे यांचेच मित्र कबिंद्र लजपतसिंग ठाकूर व अमित दिलीप थापा यांना ताब्यात घेऊन शिवानीची सुखरुप सुटका केली. मात्र भरदिवसा घडलेल्या या अपहरण प्रकरणाचा पालकांनी मोठा धसका घेतला. बुधवारी दुपारपासून ख्रिस्तानंद विद्यालयासमोर पालक, विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. येथील चौकाचौकात, रस्त्यावर याच प्रकरणाची चर्चा केली जात होती. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असले तरी पालकवर्ग मात्र या घटनेमुळे भयभित झाले आहेत. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने शाळेत व शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)आरोपींना पकडण्यात पत्रकारांचेही सहकार्यअपहरणानंतर आरोपी कबींद्र ठाकूर शाळेसमोर आला होता. याची माहिती मुलीच्या आईने लोकमतचे तालुका प्रतिनिधी रवी रणदिवे व पत्रकार अरविंद चुनारकर यांना दिली. त्यानंतर या पत्रकारांनी कबींद्रला आपल्या मोटरसायकलवर बसवून पोलीस ठाण्यात नेले. तिथे संशयावरून पोलिसी खाक्या दाखविताच कबींद्रने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान याबाबत या पत्रकारांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावतीनेही शुक्रवारी रवी रणदिवे व अरविंद चुनारकर यांचा सत्कार केला जाणार आहे.संयुक्त व्यवसायातून रचला अपहरणाचा कटमुलीच्या वडीलाचे निसर्गोचार केंद्र असून आरोपी कबिंद्र याच्याशी २००२ मध्ये दिल्ली येथे ओळख झाली होती. दिल्लीच्या सूर्या फाऊंडेशन संस्थेमार्फत दोघांनाही चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काम मिळाले. मुलीच्या वडिलांचे निसर्गोपचार के ंद्र पाहून कबिंद्र यांने त्यांच्याशी जवळीकता साधली. त्यांनी संयुक्त व्यवसाय सुरु केला. निसर्गोचार केंद्रासाठी दोघांनीही प्रत्येकी ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. यासाठी कबिंद्रने बिगर सहकारी संस्थेतून ५० हजार रुपयाचे कर्ज घेतले. मात्र, निसर्गपचार केंद्रात उपचार करण्याऐवजी कबिंद्र हा कुंटुबातच वेळ घालवायचा. त्यामुळे दोघात थोडा दुरावा निर्माण झाला. दीड महिना एकत्र काम केल्यानंतर कबिंद्र याने मूल येथे स्वत:चा निसर्गोपचार केंद्र सुरु केले. त्यामुळे दोघांत आणखी दुरावा वाढला. मुलीच्या वडीलांसोबत केलेल्या गुुतंवणूकीचे पैसे त्याने फोन करुन मागणे सुरु केले. अनेकदा मुलीच्या आईलाही फोन करुन पैशाची मागणी करायचा. पैशासाठी त्याने अनेक वेळा धमकीही दिली होती. यातूनच त्याने मुलीचे अपहरण करुन वडीलांकडून पैसे मागण्याचा कट रचला.
शाळांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
By admin | Published: November 20, 2014 10:49 PM