घुग्घुस : शहरातील विविध शाळा, सामाजिक संस्थांच्या वतीने सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आहे. चंद्रपूर मार्गावरील मल्हारगड दत्त मंदिर देवस्थान परिसरात घुग्घुस येथे योग दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष व जि.प.चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक गावांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात झाले. सध्या कोरोना संकटात योगाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याेग ही आपल्या देशाची ओळख होती. ती आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. करे योग रहे निरोग, असे आवाहन ही देवराव भोंगळे यांनी यावेळी केले. या निमित्ताने लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व योग शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, वाफारा मशीन देऊन करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि.प सभापती नितूताई चौधरी योग शिक्षक अनिल नित, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी जि.प. सदस्य चिन्नजी नलभोगा, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, सुचिता लुटे,वैशाली ढवस, प्रेमलाल पारधी,डॉ. ठाकरे, सुमन वऱ्हाटे, वंदना बोबडे, बबन कोयाडवार, हेमराज बोंबले, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, निरंजन नगराळे, पांडुरंग थेरे,दशरथ असपवार, भारत साळवे, तुलसीदास ढवस, रवी चुने, हेमंत पाझरे,सुशील डांगे उपस्थित होते.
सरस्वती विद्यामंदिरात योग दिन
बागला चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवी घुग्घुस येथील शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन प्रोजेक्ट मांडलिफ प्रोग्राम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून योग शिक्षिका पायल राजपूत यांनी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक श्रीकांत जोशी, शिक्षक दशरथ आसपवार, शिक्षिका अनिता बेले, गीता पाझारे, सुचिता थोरात, किशोर बेहेरे, प्रकाश बोरकर, चंदन बंड, सुनील उपरे, सुनील सिडाम उपस्थित होते.
नकोडा राम मंदिरात योग दिन
राम मंदिर नकोडा येथे योग कार्यक्रम घेण्यात आला. योगगुरू म्हणून डॉ. झाडे, क्षीरसागर व संजय रामचंद्र उपाध्ये यांचे सहकार्य लाभले. यावेळी नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.पं. सदस्य तनुश्री बांदूरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, ग्रा.पं. सदस्य रजत तुरणकार, भाजप संघटक महादेव वाघमारे, अध्यक्ष बाळकृष्ण निखाडे, सचिव सोमनाथ वाटाणे, अनिल गुप्ता, महादेव पाझारे, विजय चव्हाण, संतोष मुक्के, शंकर वासेकर व गावातील नागरिक उपस्थित होते.
===Photopath===
220621\img_20210622_120457.jpg
===Caption===
म्हलारगड येथील मैदानात योगा करताना करताना