लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील तीन वर्षांपासून भद्रावतीनजीकची कर्नाटका पॉवर कार्पोरेशनची कोळसा खाण बंद आहे. कामगार व कंत्राटदारांची थकीत रक्कम घेणे असताना कर्नाटका पॉवर कार्पोरेशनचे अधिकारी बंद कोळसा खाणीत येवून यंत्र सामुग्री घेऊन जात असल्याने ‘त्या’ अधिकाऱ्यांना कोळसा खाणीत प्रवेश बंदी करण्याची मागणी आमदार बाळू धानोरकर व कामगारांंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.कर्नाटका पॉवर कार्पोरेशनच्या वतीने भद्रावती नजीकच्या बरांज गावाच्या शिवारात कोळसा खाण हलविण्यात येत होती. सदर कोळसा खाण १ एप्रिल २०१५ पासून कंपनीने बंद केली. त्यामुळे या खाणीत कार्यरत ४६८ कामगारांचे वेतन मागील तीन वर्षांपासून थकीत आहे. कामगारांना स्थायी नोकरी देण्यात यावी, कर्नाटका एम्टा कंपनीच्या वतीने बरांज व चेक बरांज गावाचे पूनर्वसन व बरांज गावातील पडलेल्या घरांचा मोबदला ग्रामपंचायत रेकार्ड गाव नमुना आठ नुसार देण्यात यावा, सुरक्षा रक्षकाचे थकीत व चालू वेतन देण्यात यावे, उर्वरीत जमीन संपादीत करण्यात यावी व काही संपादीत केलेल्या जमीनीचा पूर्ण मोबदला देण्यात यावा, कोळसा ट्रान्सपोर्ट व्यवसायीकांचे थकीत देयके अदा करण्यात यावे, कंत्राटदारांचे थकीत देयके देण्यात यावे, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बंद असलेल्या कोळसा खाणीत कुठलेही काम कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडने करु नये, असे म्हटले आहे. तसे प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्था भंग होवू शकते. याची जबाबदारी कंपनीवर राहील. त्यामुळे अधिकाºयांना बंद कोळसा खाणीत प्रवेश बंदी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.बंगाल एम्टाप्रमाणे कामगारांना वेतन द्यावेकलकत्ता येथील बंगाल एम्टा कोळसा खदान बंद आहे. परंतु तेथील कामगारांना वेतन देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर बरांज येथील कर्नाटका एम्टा मधील कामगारांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडने वेतन द्यावे, अशी मागणी राजू डोंगे यांनी बैठकीत केली.अधिकाऱ्यांना माघारी पाठविलेमागील काही वर्षांपासून अनियमीत वेतनावर कर्नाटक एम्टा बंद कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. या सुरक्षा रक्षकांना काढून त्या ऐवजी कर्नाटक राज्यातील सुरक्षा रक्षक नेमण्याच्या हालचाली कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडने सुरु केल्याची माहिती कामगारांना मिळताच, त्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्यात आले होते. त्यामुळे कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेचे अधिकारी आल्या पावली परत गेले.वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील बैठक घेणारभद्रावतीचे तहसीलदार महेश शितोडे, आमदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, कामगार नेते राजू डोंगे, विनोद मत्ते व इतर कामगार सरपंच व उपसरपंच यांची बैठक झाली. त्यावेळी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करुन पुढील बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
कर्नाटक एम्टा खाणीत अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:14 PM
मागील तीन वर्षांपासून भद्रावतीनजीकची कर्नाटका पॉवर कार्पोरेशनची कोळसा खाण बंद आहे. कामगार व कंत्राटदारांची थकीत रक्कम घेणे असताना कर्नाटका पॉवर कार्पोरेशनचे अधिकारी बंद कोळसा खाणीत येवून यंत्र सामुग्री घेऊन जात असल्याने ‘त्या’ अधिकाऱ्यांना कोळसा खाणीत प्रवेश बंदी करण्याची मागणी आमदार बाळू धानोरकर व कामगारांंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कामगारांची मागणी