शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

जटपुरा गेटसाठी येणार केंद्रीय मंत्री

By admin | Published: February 13, 2017 12:37 AM

शहरातून बाहेर पडण्याकरिता गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत एकच प्रमुख मार्ग आहे. त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे.

पर्यायी मार्ग व्हावा : वाहतूक कोंडी अडकली पुरातत्व कायद्याच्या कचाट्यातमिलिंद कीर्ती चंद्रपूरशहरातून बाहेर पडण्याकरिता गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत एकच प्रमुख मार्ग आहे. त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. जटपुरा येथील प्रवेशद्वारावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. जटपुरा गेटजवळ मोठा रस्ता करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाने नाकारला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सतत पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला असून या गेटची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री चंद्रपूरला येणार आहेत.गोंड राजांच्या काळात चांदा गावाच्या सभोवताल सुरक्षा भिंत बांधून त्याला अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बिंबा गेट आणि जटपुरा गेट तयार करण्यात आले. ही सर्व वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित करण्यात आले आहे. या संरक्षण भिंतीवर अनेक भागात अतिक्रमण करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाचे कायदे कडक असतानाही हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आंबेकर-ले-आऊट येथील काही नागरिकांनी मनपा आयुक्त व पुरातत्व विभागाला निवेदन सादर करून संरक्षण भिंतीचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. परंतु सहा महिन्यांपासून कोणाचेही अतिक्रमण काढले नाही.भिंतीवर अतिक्रमण, वाहतूक कोेंडीला कायद्याचा अडसरचंद्रपूर शहराच्या सभोवताल असलेल्या संरक्षण भिंतीवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी पुरातत्व विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. त्याविरोधात पुरातत्व विभागाने कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु कायद्याचा आधार घेऊन गांधी चौक ते जटपुरा गेट या शहरातून बाहेर पडण्याच्या ऐकरी मार्गावरील रस्ता विस्तारीकरणाचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने फेटाळून लावला आहे. गेटचे संरक्षण करण्यासाठी रस्ता मोठा करणे शक्य झालेले नाही. रस्ता अरुंद असल्याने दररोज गेटजवळ वाहनांची रांग लागत असते.जनसंघटनांची वाहतूक सुरळीत करण्याची मागणीचंद्रपूर बचाव संघर्ष समिती, बानाई अशा विविध जनसंघटनांनी जटपुरा गेट येथील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर मनपा, जिल्हाधिकारी आणि विविध स्तरावर निवेदन आणि प्रस्ताव सादर करून जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडण्याची मागणी केली आहे. जनतेला त्रास होत असल्याने विविध जनसंघटना या मुद्यावर सक्रीय झाल्या आहेत. व्हीएनआयटीचा भुयारी मार्गाला नकारजटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही पर्याय तपासण्याची सूचना केली. त्यानुसार, नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या वाहतूक शाखेला पाचारण करण्यात आले होते. व्हीएनआयटीच्या पथकाने जटपुरा गेट येथे सर्वेक्षण केले. गेटच्या खालून भुयारी मार्गाच्या पर्यायाबाबत चाचपणी करण्यात आली. परंतु जटपुरा गेटच्या खाली भुयारी मार्ग तयार करणे शक्य नसल्याचे व्हीएनआयटीने बांधकाम विभागाला कळविले आहे.जटपुरा गेट ते गिरनार चौक मार्गाचा पर्यायजटपुरा गेट येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जटपुरा गेट ते गिरनार चौक या रस्त्याचा पर्याय समोर आणला आहे. या मार्गाचा विस्तार करण्यात आल्यास वाहतुकीची समस्या चुटकीसरशी सुटू शकते. त्याकरिता जटपुरा गेट सोडून असलेला रस्ता मोठा करण्याची गरज आहे. त्यामध्ये जटपुरा गेटला कोणतेही नुकसान पोहोचत नाही. परंतु त्याकरिता संरक्षण भिंतीचा काही भाग पाडावा लागतो. त्याला पुन्हा पुरातत्व विभागाचा अडसर आडवा येतो. त्यामुळे हा पर्याय प्रलंबित आहे.जटपुरा गेटची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेथे गेट खालून भुयारी मार्ग करणे शक्य झालेले नाही. गेटजवळही रस्ता करण्यास कायद्याचा अडसर आहे. तांत्रिक समस्या उद्भवली आहे. त्याकरिता केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे. गेटची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री चंद्रपूरला येणार आहेत. जटपुरा गेट सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर झालेला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.-ना. सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, चंद्रपूर.जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नागपूर येथील व्हीएनआयटीला भुयारी मार्गाबाबत कळविण्यात आले होते. व्हीएनआयटीने सर्वेक्षण करून गेट खालून भुयारी मार्ग करणे शक्य नसल्याचा लेखी अहवाल दिला आहे. त्यामुळे तो पर्याय बारगळला आहे. आता ही वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मनपाला पुन्हा प्रयत्न करावे लागतील.- मनोज जयस्वाल, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम.