लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घुग्घुस येथील वेकोलिच्या राजीव रतन या क्षेत्रिय रूग्णालयातील आरोग्य सेवांमध्ये वाढ करून केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. हे रूग्णालय २०१९ पर्यंत आधुनिकीकरण पूर्ण होणार असून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.गुरूवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात वेकोलि विश्रामगृहात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी वेकोलिच्या घुग्घुस येथील क्षेत्रीय रूग्णालयाच्या अपगे्रडेशनसंदर्भात माहिती जाणून घेतली.राजीव रतन हॉस्पिटलला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्याने चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. दरम्यान ३० डिसेंबर २०१७ ला वेकोलि प्रबंध निदेशकांना बैठकीस पाचारण करून रूग्णालयाच्या उन्नतीकरणासंदर्भात ना. अहीर यांनी चर्चा केली होती. सध्या या रूग्णालयात ५० खाटा आहेत. केंद्रीय रूग्णालयामुळे ११० खाटांची क्षमता राहणार आहे. याबरोबरच अतिदक्षता विभाग, नवजात गर्भधारणा अतिदक्षता यासारख्या सुविधा अपग्रेडेशनमुळे उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय अधिकाºयांची संख्या वाढवून ती २५ पर्यंत होणार आहे.बैठकीमध्ये वेकोलिचे प्रबंध निर्देशक राजीव रंजन मिश्रा, कार्मिक निर्देशक डॉ. संजीव कुमार आदी उपस्थित होते. सदर रूग्णालयाच्या सोयीसुविधांसाठी तातडीने कार्यवाही केली जाणार आहे, अशी ग्वाही वेकोलि अधिकाºयांनी दिली.राजीव रतन क्षेत्रिय रूग्णालयासोबतच छिंदवाडा येथील पटकाई रूग्णालय, नागपुरातील जवाहरलाल नेहरू रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असणारे ही रूग्णालये मार्च २०१९ पर्यंत सुरू होण्याचे संकेत केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आले २७ जुलै रोजी प्रस्तावित केंद्रीय रूग्णालयासंदर्भात वेकोलि व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
घुग्घुस येथील राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:59 AM
घुग्घुस येथील वेकोलिच्या राजीव रतन या क्षेत्रिय रूग्णालयातील आरोग्य सेवांमध्ये वाढ करून केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. हे रूग्णालय २०१९ पर्यंत आधुनिकीकरण पूर्ण होणार असून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
ठळक मुद्देमार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार : हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश