नागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अनुषंगाने तालुका व्यवस्थापन कक्षाकडून सुरू असलेल्या विविध कामांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी भेट देऊन पाहणी केली.
पंचायत समिती, नागभीड अंतर्गत तळोधी (बा.) या गावातील भरारी प्रभाग संघ, तळोधी-गोविंदपूर प्रभागातील उडान प्रभाग संघ, गिरगाव-वाढोणा प्रभाग, बाळापूर येथील शारदा आदिवासी स्वयंसहाय्यता समूह व किरमिटी येथील विकास महिला ग्राम संघ यांचा या भेटीत समावेश होता. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी नागभीड पंचायत समितीतील विविध कामांचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सेठी यांनी या कामांना भेट दिली. या भेटीदरम्यान झालेली कामे योग्य पद्धतीने झाली आहेत का, या कामात कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे, कोणत्या बाबींची आणखी आवश्यकता आहे, कोणत्या योजनेतून या बाबींचा लाभ मिळवून देता येईल, ग्राम संघांच्या तालुकास्तरीय व गाव पातळीवरील कार्यालयांना कोणती शासकीय मदत हवी आहे, आदी बाबी समजून घेतल्या. यावेळी गटविकास अधिकारी संजय पुरी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे, पंचायत समिती, नागभीडचे तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम उपस्थित होते. अमोल मोडक, आमिर खान, शुभम देशमुख, दीपक गायकवाड, ज्योती साळवे, दीपाली दोडके, किशोर मेश्राम, अमोल जिवतोडे, निकेश हजारे, जगदीश हजारे, इंद्रजित टेकाम यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.
180921\img-20210918-wa0020.jpg
कामांची पाहणी करतांना सिईओ मिताली सेठी