लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. सुदैवाने राज्यात अद्याप परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र यापुढे कोरोना आजाराचा प्रसार टाळण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला विविध निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार जिल्ह्यात होणारे समारंभ, सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम नागरिकांनी आयोजित करू नये, यासोबतच सर्व शासकीय संमेलनेही रद्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोना रूग्णांची संख्या वाढता कामा नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठया प्रमाणात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आवश्यक उपाययोजनाचा आढावा गुरुवारीच एका उच्चस्तरीय बैठकीद्वारे घेण्यात आला, अशी माहितीही डॉ. खेमनार यांनी दिली.या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एन. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. राजेश गहलोत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जगभरामध्ये सध्या कोरोना आजाराने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूणालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आठ खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या काळामध्ये कोणतेही सण, उत्सव साजरे करताना मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील काही कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांनीही शक्यतो एकत्रित येण्यासाठीचा असणाºया कोणत्याही सण उत्सवात सहभाग टाळणे आवश्यक आहे. नाट्यगृह, सिनेमागृह याठिकाणी आणि या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे पुढील काही दिवस याबाबत गर्दीत जाणे टाळणे योग्य राहील, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.महाराष्ट्रात नागपूर, पुणे व मुंबई या ठिकाणी विदेशातून येणाºया नागरिकांना अनिवार्यपणे यासंदर्भातील तपासणीसाठी १४ दिवस आरोग्य विभागाच्या निगराणी ठेवण्यात येते. त्यामुळे विदेशात जाणे अथवा विदेशातून येणे थोडक्यात विदेशवारी या काळामध्ये टाळावी असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानक, मंगल कार्यालय व गर्दीच्या अन्य ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता राखण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केली.आपत्ती व्यवस्थापन कायदा लागूकोरोना आजाराचा प्रसार टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये ११ मार्च २०२० पासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजाराबद्दल कोणतीही अफवा पसरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण नाहीचंद्रपूर जिल्ह्यात वर्तमानपत्रांमध्ये व सोशल माध्यमांवर कोरोनाचे रूग्ण असल्याची माहिती प्रसारित होत आहे. परंतू ते सत्य नाही. चंद्रपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत कोरोना रोगाचा संशयित रूग्ण अथवा पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. या आजारात भीती बाळगण्याचे कारण नसून योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. या रोगाची लागण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी घेणे महत्त्वाची आहे.अनावश्यक प्रवास टाळावाया आजाराचा प्रसार वरिष्ठ नागरिकांमध्ये झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी व सामान्य नागरिकांनी देखील पुढील काही काळात अनावश्यक प्रवास टाळणे योग्य राहील. हॉटेल, मॉल, बाजार, यात्रा, उर्स, जयंती-पुण्यतिथी व वाढदिवस स्रेहभोजन उत्सवाच्या कार्यक्रमांना आपाल्या स्तरावर काही प्रमाणात लगाम घालणे अतिश आवश्यक असून प्रत्येक कुटुंबाने यासंदर्भात जागरूक रहावे, असे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
समारंभ, सार्वजनिक गर्दीच्या कार्यक्रमांना अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:00 AM
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोरोना रूग्णांची संख्या वाढता कामा नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठया प्रमाणात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आवश्यक उपाययोजनाचा आढावा गुरुवारीच एका उच्चस्तरीय बैठकीद्वारे घेण्यात आला, अशी माहितीही डॉ. खेमनार यांनी दिली.
ठळक मुद्देसर्व शासकीय कार्यक्रमेही रद्द : कोरोनाबाबत जिल्हा प्रशासन गंभीर