शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

चंद्रपूर, नागपूरसह परराज्यांत चेन स्नॅचिंग करणाऱ्यास वर्धा येथून अटक

By परिमल डोहणे | Published: April 24, 2023 10:49 PM

विविध ठिकाणी आहेत १६ गुन्हे दाखल : एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त 

चंद्रपूर : चंद्रपूर, नागपूरसह परराज्यांत घरफोडी व चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस वर्धा येथील एका वसाहतीमधून चंद्रपूर रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन असा एकूण एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सूरज शेट्टी (कोरवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अधिक चौकशीत त्याच्यावर तेलंगना, आंध्रप्रदेश येथे १६ गुन्हे घरफोडीचे तर नागपूर, आदिलाबाद येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

चंद्रपूर शहरातील गुलमोहर काॅलनी निवासी नीलम देशपांडे १ एप्रिलच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान मोपेडने घरी जात होत्या. गुलमोहर कॉलनीच्या टर्निंगवर एका पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकल चालकाने मागून २० हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोन्याची चेन पळवली तर २ एप्रिलला सिस्टर कॉलनी येथे सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान रंजना वैद्य फिरण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकल चालकाने मागून येऊन मंगळसुत्र पळविले, अशी तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे रामनगर येथील गुन्हे शोध पथक, डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून परिसरात चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेरे बघितले. यावेळी मोटारसायकल व आरोपीची ओळख पटली. दरम्यान रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे यांनी सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार यांचे वेगवेगळे तीन पथक तयार केले.

तपासाअंती तो वर्धा येथे दडून बसल्याचे समोर आले. पोलिसांनी वर्धा गाठून त्याला अटक करत त्याच्याकडून एक लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो चंद्रपूरसह नागपूर, तेलंगणा आंध्रप्रदेश येथेही घरफोडी व चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेश मुळे, ठाणेदार लता वाढीवे, एपीआय हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, नापोशी विनोद यादव आदींनी केली.बॉक्स

असा लावला चोरट्याचा शोधपोलिसांचे पथक दररोज चंद्रपूर शहरातील सहा ते आठ दिवस सकाळी ४ ते ६ दरम्यान चंद्रपूर शहरात प्रवेश करणारे मार्ग रहमतनगर तसेच पठाणपुरा येथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. १४ एप्रिलला पहाटेदरम्यान संशयित मोटारसायकल घेऊन एक हेल्मेटधारी इसम पठाणपुराकडून चंद्रपूरमध्ये प्रवेश करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. एपीआय हर्षल एकरे यांनी त्याचा पाठलाग करत चारचाकी वाहनाने मोटारसायकलला ठोस मारली तरीही तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. जंगलात त्याने आपले कपडे काढून ठेवले होते. पोलिसांनी माहितीवरून आंध्रप्रदेश, तेलंगणा येथे त्याच्या शोधार्थ चमू रवाना केली तेव्हा तो वर्धा येथे दडून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वर्धा गाठून शांतीनगर वसाहतीत त्याला अटक केली.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरी