लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा खाणींमुळे ब्लॅक गोल्ड सिटी म्हणुन लौकिकास आलेल्या चंद्रपूर शहराने जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात अनेक प्रतिभावंतांना जगापुढे आणले आहे. त्यातच एक सुवर्ण झळाळी असलेली भर पडली असून चंद्रपूरातील युवकाला अमेरिकेत उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार २१ आॅक्टोबरला देण्यात आला आहे. हा दिमाखदार सोहळा अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमध्ये टाईम्स स्क्वेअर परिसरात झाला. आपल्या प्रतिभेने जिल्ह्याचे नाव साता समुद्रापार नेणाऱ्या या युवकाचे नाव आहे विप्लव शिंदे. तो येथील सराफा व्यवसायी आणि गाडगेबाबांच्या आदर्शावर चालणारे डेबू सावली वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष व भारती शिंदे यांचा सुपूत्र आहे.द कटिंग रुम इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलच्या पहिल्याचवर्षी विप्लवनी हा पुरस्कार घेऊन आणखी एका इतिहासाची नोंद केली आहे. त्याची एकलिफ्ट स्टोरी या लघुपटाला जगभरातील उत्कृष्ट ६० चित्रपटांमधुन निवडण्यात आले. या वैश्विक फेस्टिवलसाठी अमेरिकेसह जगातील १० पेक्षा अधिक देशांतून १५० हून जास्त प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून निवडक ६० चित्रपटांना निवडून स्क्रिनींग करण्यात आले. त्यातूनच विप्लव शिंदेच्या एक लिफ्ट स्टोरी लघुपटाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा लघुपट अमिताभ बच्चनला लोकप्रिय बनविण्यात योगदान देणारे निर्माते-दिग्दर्शक स्व.प्रमोद चक्रवर्ती यांच्या प्रमोद फिल्म्सने प्रोडयुस केला असून चंद्रपूरचे नाव या क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारा विप्लव शिंदे हा पहिलाच युवा दिग्दर्शक ठरला आहे. अमेरिकेत हा पुरस्कार ग्रहण करतानाह त्याने चंद्रपूर आणि चंद्रपूरकरांच्या पे्रमाची प्रांजळ कबूली दिली. येणाºया काळात बीग बजेटच्या सिनेमावर काम करण्याची माहिती ही त्याने दिली. उल्लेखनीय असे की, यापुर्वी त्याच्या द किड लघुपटाचीही चर्चा झाली होती. विप्लवने सुभाष घईच्या विस्टलींगवूडस मधून दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्या या यशाने चंद्रपूरच्या कला जगतात आनंद व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरच्या विप्लव शिंदेला मिळाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:25 AM
चंद्रपूरातील युवकाला अमेरिकेत उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार २१ आॅक्टोबरला देण्यात आला आहे.
ठळक मुद्देजिल्ह्याच्या कला विश्वात रोवला मानाचा तुरा