- साईनाथ कुचनकारचंद्रपूर - अगदी विपरीत परिस्थितीतून पुढे येत कला क्षेत्रात हळूहळू आपले पाय रोवणारा चंद्रपुरातील दिव्यांग विद्यार्थी जागतिक मंचावर पोहचला आहे. जागतिक व्यासपीठावर आपल्या कलेचे सादरीकरण करून त्याने चंद्रपूरचे नाव उंचावले आहे.
जागतिक स्तरावरील कलावंतांसाठी गोवा येथे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट २०२४ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. यात पुणेच्या 'बाल कल्याण संस्था‘ येथील दिव्यांग कलावंतांची 'सनई चौघडा' सादरीकरणासाठी निवड झाली. यात चंद्रपूरचा दिव्यांग कलावंत देवांशू शिंगरू याच्यासह संजीव हेबळे, हिमेश हबका, प्रकाश माळी, साकेत देवाचाके, अथांग भंडारे या दिव्यांग कलावंतांचा सहभाग होता.
मागील वर्षी देवांशू आणि त्याच्या बाल कल्याण संस्थेतील अन्य कलावंतांना 'गंध फुलांचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले होते. आता गोव्यातील जागतिक मंचावर सादरीकरण करून देश विदेशातील श्रोत्यांची वाहवा मिळविली. देवांशूला बालकल्याण संस्था पुणेचे दत्तात्रय भावे आणि त्यांचे सुपुत्र ऋषिकेश भावे यांचे मार्गदर्शन लाभले.
पुणे येथे प्रशिक्षणचंद्रपुरातील राकेश आणि मेघना शिंगरू या दाम्पत्याचा मुलगा असलेला देवांशू दिव्यांग आहे. त्याला पूर्वीपासूनच वादनाची आवड आहे. त्याच्या पालकांनी ही आवड हेरून त्याला पुणे येथील बाल कल्याण संस्थेत प्रवेश दिला. तेथून देवांशूच्या केलेला खरा आकार मिळाला. अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम त्याने गाजविले.