चंद्रपूर : चिमूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नेरी येथील काँग्रेसच्या लता अरुण पिसे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शंकरपूरचे भाजपचे रोशन ढोक यांची निवड झाली. कोरपना पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या रुपाली तोडासे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या सिंधुताई आस्वले यांची निवड झाली. गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सुनिता येगेवार तर उपसभापतीपदी भाजपचे अरुण कोडापे यांची निवड करण्यात आली.ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे रामलाल दोनाडकर यांची तर उपसभापतीपदी सुनिता ठवकर यांची निवड झाली. नागभीड पं.स.च्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रणया गड्डमवार यांची तर उपसभापतीपदी रवी देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली. सावली पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे विजय कारेवार तर उपसभापतीपदी भाजपाचे रवींद्र बोलीवार यांची निवड झाली. जिवती पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या अंजना पवार यांची तर उपसभापतीपदी भाजपाचे महेश देवकते यांची निवड झाली. मूल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे चंदू मारगोनवार यांची तर उपसभापतीपदी घनश्याम जुमनाके यांची निवड झाली. राजुरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या मुमताज अब्दुल जावेद यांची तर उपसभापतीपदी मंगेश गुरुनुले यांची निवड झाली. भद्रावती पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या नाजुका मंगाम तर उपसभापतीपदी भाजपाचे प्रवीण ठेंगणे यांची निवड झाली.सिंदेवाही पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या मंदा बाळबुध्दे तर उपसभापतीपदी भाजपाच्या लता किन्नाके यांची निवड झाली. बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या इंदिरा पिपरे तर उपसभापतीपदी सोमेश्वर पद्मगिरीवार यांची निवड झाली. वरोरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र धोपटे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संजीवनी भोयर यांची निवड झाली. चंद्रपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे केमा रायपुरे तर उपसभापतीपदी निरीक्षक तांड्रा यांची निवड झाली. पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक एकाचेही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने रद्द झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी सात पंचायत समितीवर झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 6:56 PM