लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील बारसागड ते मेहा व मंगरमेंढा निफंद्रादरम्यान वन परिसरात असलेल्या विना गतीरोधक असलेल्या चौरस्त्यावर एस.टी.बस व क्वालीस गाडीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.चिमुर डेपोची चिमुर गडचिरोली बस क्र.एम.एच ४० वाय ५२६७ क्रमांकाची बस मंगरमेढावरुन निफंद्रामार्गे गडचिरोलीला ४९ प्रवासी घेऊन जात होती. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एम, एच,३१ सी, ए, एम,४०१२ क्रमांकाच्या क्वालीस गाडीने तिला बारसागड चौकात धडक दिली. चिमुर तालुक्यातील सोनेगाव येथील असुन बोरमाळा येथे नवसाच्या कार्यक्रमासाठी एका परिवाराला घेऊन ही गाडी जात होती. बारसागड जवळच्या चौरस्त्यावर बस आणि क्वालीसच्या चालकास दोन्ही वाहने एकमेकास न दिसल्याने चौक पार करण्याच्या प्रयत्नात असतांना क्वालीसने एस.टी ला धडक मारली यामध्ये क्वालीस गाडीतील एका महिलेस व लहान मुलास किरकोळ दुखापत झाली. त्यांना अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. एसटीतील प्रवाशांना कुठलीही हानी झाली नाही. पाथरी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात एसटी बस व क्वालीस गाडीची टक्कर; जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:43 PM
सावली तालुक्यातील वन परिसरात असलेल्या विना गतीरोधक असलेल्या चौरस्त्यावर एस.टी.बस व क्वालीस गाडीची समोरासमोर धडक झाली.
ठळक मुद्देवळणावर वाहने न दिसल्याने झाला अपघात